Lokmat Money > बिझनेस न्यूज > Bajaj Auto News : शेअर बाजारात पडझड; बजाज ऑटो ७ टक्के घसरल्याने ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी खाली

Bajaj Auto News : शेअर बाजारात पडझड; बजाज ऑटो ७ टक्के घसरल्याने ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी खाली

Stock Market Opening : बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये ७-७.५० टक्क्यांच्या तीव्र घसरणीमुळे ऑटो इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक घसरला असून त्यामुळे बाजारही खालच्या पातळीवर आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 10:01 AM2024-10-17T10:01:48+5:302024-10-17T10:01:48+5:30

Stock Market Opening : बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये ७-७.५० टक्क्यांच्या तीव्र घसरणीमुळे ऑटो इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक घसरला असून त्यामुळे बाजारही खालच्या पातळीवर आला आहे.

stock market update nifty slips below 25k amnd auto index dowun due to bajaj auto decline | Bajaj Auto News : शेअर बाजारात पडझड; बजाज ऑटो ७ टक्के घसरल्याने ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी खाली

Bajaj Auto News : शेअर बाजारात पडझड; बजाज ऑटो ७ टक्के घसरल्याने ऑटो इंडेक्स २ टक्क्यांनी खाली

Stock Market Opening : शेअर बाजाराची सुरुवात धमाक्याने सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच घसरण सुरू झाली. वास्तविक, आजचा दिवस अतिशय व्यस्त असणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत. बँक निफ्टी ५१९०० च्या पातळीवर दिसत आहे. मिडकॅप निर्देशांक जवळपास अर्धा टक्का वर आहे. बजाज ऑटोच्या शेअर्समध्ये (Bajaj Auto Share) ७-७.५० टक्क्यांच्या तीव्र घसरणीमुळे ऑटो इंडेक्स २ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

शेअर बाजार कसा उघडला?
बीएसई सेन्सेक्स २५६.७१ अंकाच्या वाढीसह ८१,७५८ वर उघडला. परंतु, बाजार उघडल्यानंतर १० मिनिटांतच तो वरच्या स्तरावरून खाली आला. बाजाराच्या सुरुवातीला, निफ्टी ५६.१० अंकांच्या किंवा ०.२२ टक्क्यांच्या वाढीसह २५,०२७ वर उघडला होता, परंतु सुरुवातीच्या १० मिनिटांनंतर, तो लाल रंगात घसरला आणि २५,००० च्या खाली आला. सध्या निफ्टी २४९४० च्या पातळीवर दिसत आहे. सकाळी ९.४४ वाजता, बीएसई सेन्सेक्सच्या ३० पैकी फक्त ७ शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते आणि २३ शेअर्स वधारत होते.

बजाज ऑटोमध्ये घसरण का? (Why Bajaj Auto is falling today?)
बजाज ऑटोचे (Bajaj Auto) त्रैमासिक निकाल काल म्हणजेच बुधवारी आले. निकाल चांगले होते. परंतु, भविष्यातील महसूल मार्गदर्शक आकडे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नव्हते. या कारणास्तव, हा शेअर आज घसरत आहे. सकाळी ९.५० वाजता तो ८.८१ टक्क्यांनी घसरत आहे. १०२३ रुपयांनी घसरल्यानंतर १०,५९३ रुपयांवर व्यवहार करत आहे. या शेअरचे इंडेक्समध्ये वजन जास्त असल्याने ऑटो इंडेक्स आणि बीएसई-एनएसईच्या प्रमुख इंडेक्समध्येही घसरण झाली आहे.

Web Title: stock market update nifty slips below 25k amnd auto index dowun due to bajaj auto decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.