Stock Market Update: आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजप बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. दरम्यान, ही मतमोजणी सुरू असताना शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. सकाळी 10.30 वाजता सेन्सेक्स 1354 अंकांनी वाढून 55,980 अंकांवर तर निफ्टी 381 अंकांनी वर आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर हळूहळू बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. या वाढीदरम्यान, अॅक्सिस बँक 7 टक्के, टाटा मोटर्स 6.5 टक्के आणि एसबीआय 5 टक्के वाढ नोंदवत आहे. आज बाजाराला मजबूत जागतिक ट्रेंडचाही पाठिंबा मिळत आहे. या संकेतांमुळे आज बाजार सुरू होताच 1200 अंकांवर चढला.
प्री-ओपन झाल्यापासून बाजार मजबूत स्थितीत आहे. प्री-ओपन सत्रात सेन्सेक्स 2.5 टक्क्यांपर्यंत वाढला होता. एसजीएक्स निफ्टीही मजबूत राहिला. सकाळी 09:20 वाजता सेन्सेक्स 55,800 अंकांच्या आसपास व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे निफ्टीने 2 टक्क्यांहून अधिक वाढ करून 16.650 चा टप्पा ओलांडला होता.
कच्चे तेल विक्रमी पातळवररशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील शेअर बाजारात विक्रीचे वातावरण आहे. या सर्व घडामोडींमध्ये कच्च्या तेलातमध्येही एक उकळी आली असून तो 13 वर्षांच्या विक्रमी पातळीवर गेला आहे. रशियाच्या तेल आणि वायूवर अमेरिकेने निर्बंध लादल्यानंतर गुंतवणूकदार घाबरले आहेत. भारतीय बाजारपेठेतही हा कल स्पष्टपणे दिसत आहे कारण FPIs सतत पैसे काढत आहेत. काल बाजारात प्रचंड तेजी आली असली तरी एफपीआयने भारतीय बाजारातून सुमारे 5 हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाचा काय परिणाम?तिकडे, रशिया आणि युक्रेनमधील चर्चेतून तोडगा निघण्याची आशा वाढल्याने बाजाराला पाठिंबा मिळाला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव चर्चेसाठी तुर्कीला पोहोचले आहेत. आज ते युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांची भेट घेणार आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर दोन्ही परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भेटत आहेत. या संकेतांच्या आधारे जपानचा निक्की 3.4 टक्क्यांनी वधारला. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बाजार 1 टक्क्यांपर्यंत मजबूत झाला. चीनचा शांघाय कंपोझिट 1.96 टक्के आणि हाँगकाँगचा हँग सेंग 1.8 टक्क्यांनी वधारला.