Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजारचे दमदार कमबॅक; सेन्सेक्स 820 अन् निफ्टी 250 अंकांनी वधारले...

शेअर बाजारचे दमदार कमबॅक; सेन्सेक्स 820 अन् निफ्टी 250 अंकांनी वधारले...

Stock Market Update: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी 4.39 लाख कोटी रुपयांची कमाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 04:46 PM2024-08-09T16:46:06+5:302024-08-09T16:46:35+5:30

Stock Market Update: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी 4.39 लाख कोटी रुपयांची कमाई केली.

Stock Market Update Strong comeback of stock market; Sensex 820 and Nifty up 250 points | शेअर बाजारचे दमदार कमबॅक; सेन्सेक्स 820 अन् निफ्टी 250 अंकांनी वधारले...

शेअर बाजारचे दमदार कमबॅक; सेन्सेक्स 820 अन् निफ्टी 250 अंकांनी वधारले...

Stock Market Closing On 9 August 2024 : गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर शेअर बाजाराने आज दमदार कमबॅक केले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 820 अंकांच्या वाढीसह 79,706 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 250 अंकांच्या वाढीसह 24,367 अंकांवर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, ऊर्जा आणि बँकिंग सेक्टरच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली.

वाढणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात, टाटाचा ट्रेंट शेअर्स 11.18 टक्के किंवा 631 रुपयांच्या वाढीसह 6275 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला. याशिवाय आयशर मोटर्स 5.54 टक्के, ओरॅकल फिन सर्व्हिसेस 5 टक्के, इन्फोएज 4.37 टक्के, एमसीएक्स इंडिया 3.92 टक्के, सन टीव्ही नेटवर्क 3.68 टक्के, कॅनरा बँक 3.27 टक्के वाढीसह बंद झाले.

घसरणारे शेअर्स
तसेच, अपोलो टायर्स 3.84 टक्के, हिंदुस्थान पेट्रोलियम 3.21 टक्के, एमआरएफ 2.48 टक्के, डाबर इंडिया 2.12 टक्के, गुजरात गॅस 1.76 टक्के, दालमिया भारत 1.66 टक्के, गोदरेज कंझ्युमर 1.30 टक्के आणि मॅक्स फायनान्शियल 1.30 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये 4 लाख कोटींची वाढ 
बाजारातील प्रचंड तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 450.14 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 445.75 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.39 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
 

Web Title: Stock Market Update Strong comeback of stock market; Sensex 820 and Nifty up 250 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.