Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण; Cipla बनला आजचा हिरो, IT वर विक्रीचा दबाव

दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण; Cipla बनला आजचा हिरो, IT वर विक्रीचा दबाव

Stock Market Updates: आज देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केलं. निफ्टी १३५ अंकांनी घसरून २४२०५ वर तर सेन्सेक्स ५५३ अंकांनी घसरून ७९३८९ अंकांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 04:05 PM2024-10-31T16:05:55+5:302024-10-31T16:05:55+5:30

Stock Market Updates: आज देशभरात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना निराश केलं. निफ्टी १३५ अंकांनी घसरून २४२०५ वर तर सेन्सेक्स ५५३ अंकांनी घसरून ७९३८९ अंकांवर बंद झाला.

stock market updates 31 october nifty and sensex outlook global market under pressure | दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण; Cipla बनला आजचा हिरो, IT वर विक्रीचा दबाव

दिवाळीच्या दिवशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण; Cipla बनला आजचा हिरो, IT वर विक्रीचा दबाव

Stock Market Updates : दिवाळीच्या दिवाशी गुंतवणूकदारांच्या आनंदावर विरझण पडलं आहे. आज पुन्हा एकदा बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. निफ्टी १३५ अंकांनी घसरून २४२०५ वर तर सेन्सेक्स ५५३ अंकांनी घसरून ७९३८९ अंकांवर बंद झाला. निफ्टीच्या टॉप गेनर्सबद्दल बोलायचे तर, सीआयपीएलए हा दिवसाचा हिरो होता. CIPLA सुमारे ९.५% वाढीने बंद झाला. याशिवाय एलटी, ओएनजीसी आणि डॉ. रेड्डीज यांसारख्या शेअर्समध्येही वाढ झाली. आयटी शेअर्स दबावाखाली आहेत. एचसीएल टेकमध्ये सर्वाधिक ३.६ टक्के घसरण झाली. याशिवाय टेक महिंद्रा, टीसीएस आणि एशियन पेंट्सवरही दबाव दिसून आला.

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. पण, सुरुवातीच्या व्यवहारातच विक्रीचा दबदबा राहिला. आज सकाळी सेन्सेक्स १०३ अंकांनी वाढून ८००४४ वर, निफ्टी ९ अंकांनी मजबूत होऊन २४३५० वर उघडला. बँक निफ्टी १५८ अंकांच्या घसरणीसह ५१६४९ वर लाल रंगात उघडला. सुरुवातीच्या व्यवहारातच निफ्टीमध्ये ४० अंकांची घसरण दिसून आली आणि तो पुन्हा २४३०० च्या खाली घसरला.

Cipla ठरला हिरो
देशभरात आज दिवाळीचा उत्साह आहे. मात्र, उद्या शुक्रवारी सायंकाळी मुहूर्ताची खरेदी-विक्री होणार आहे. आज बाजार सामान्यपणे कार्यरत राहिला. चांगल्या निकालानंतर, सिप्लाचा शेअर ८ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. तो निफ्टीचा टॉप गेनर राहिला आहे. याशिवाय, LT, Hero MotoCorp आणि डॉ. रेड्डीज सारख्या समभागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, इन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा आणि मारुती या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीच्या सर्वाधिक तोट्यात आहेत.

जागतिक बाजारपेठेवर दबाव
बुधवारी २ व्यापार सत्रांच्या गतीला ब्रेक लागला. निफ्टी १२६ अंकांच्या घसरणीसह २४३४० च्या पातळीवर बंद झाला. तर जागतिक बाजारात सुस्त व्यापार होता. अमेरिकन बाजारही संथ आहे. डाऊ जोन्समध्ये ९१ अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तो त्याच्या उच्चांकावरून ३०० अंकांनी घसरला आणि दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. आर्थिक आकडेवारी आणि निकालांच्या आधारे अमेरिकेत हालचाल दिसून आली.
 

Web Title: stock market updates 31 october nifty and sensex outlook global market under pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.