Stock Market Updates: शेअर बाजाराची सुरुवात आजही फ्लॅट झाली. मात्र, सेन्सेक्स-निफ्टी ग्रीन झोनमध्ये कायम राहिला. सेन्सेक्स ५० अंक, निफ्टी २० अंक आणि बँक निफ्टी १०० अंकांनी वधारले. आजही मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात खरेदी दिसून आली आहे. तर दुसरीकडे ऑटो शेअर्सवर दबाव दिसून आला.
एफएमसीजी शेअर्समध्ये आज चांगली तेजी दिसून आली. एचयूएल, आयटीसी, एचडीएफसी बँक, एचडीएफसी लाइफ, कोल इंडिया यांचे शेअर्स निफ्टीत सर्वाधिक वधारले. त्याचवेळी इन्फोसिस, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स यांचे शेअर्स घसरले. कामकाजाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ४७ अंकांनी वधारून ८०,२८१ वर खुला झाला. निफ्टीमध्ये कोणताही बदल न होता २४,२७४ वर उघडला. बँक निफ्टी ८८ अंकांनी वधारून ५२,३८९ वर उघडला.
देशांतर्गत शेअर बाजारातील विक्रीनंतर थोडा स्थिर व्यवसाय दिसत आहे. मात्र, सध्या बाजार किंचित वाढ कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सलग चार दिवस नवा उच्चांक गाठल्यानंतर बुधवारी अमेरिकन बाजारात नफावसुली झाली. आज थँक्सगिव्हिंग डेच्या निमित्ताने अमेरिकन बाजारपेठा बंद राहणार आहेत. आज गुरुवारी (२८ नोव्हेंबर) निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. सकाळी गिफ्ट निफ्टी २४३०० च्या जवळ स्थिरावला होता. तर दुसरीकडे डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी तर निक्केई १०० अंकांनी वधारले.