मुंबई : कमजोर तिमाही निकाल आणि जागतिक पातळीवरील नरमाईचा कल यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १४४ अंकांनी घसरून ३ महिन्यांच्या नीचांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला.
बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. तथापि, नंतर तो नरम पडला. सत्राच्या अखेरीस १४३.६३ अंकांच्या घसरणीसह तो २७,५२९.९७ अंकांवर बंद झाला. ८ जुलैनंतरची ही नीचांकी पातळी ठरली. शुक्रवारच्या सत्रात सेन्सेक्स वाढला होता. एनएसई निफ्टी ६३ अंकांनी घसरून ८,५२0.४0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स समाविष्ट असलेल्या ३0 पैकी २४ कंपन्यांचे समभाग घसरले. केवळ ६ कंपन्यांचे समभाग वर चढले. एम अँड एमचा समभाग सर्वाधिक ३.२२ टक्क्यांनी घसरला. हीरो मोटोकॉर्प, एशियन पेंट्स, एचडीएफसी, बजाज आॅटो, एल अँड टी आणि आरआयएल यांचे समभागही घसरले. (प्रतिनिधी)
>नरमाईचाच कल...
व्यापक बाजारातही नरमाईचाच कल राहिला. मिडकॅप 0.९५ टक्क्यांनी, तर स्मॉलकॅप 0.५२ टक्क्यांनी घसरला. आशियाई तसेच युरोपीय बाजारांतही घसरणीचाच कल दिसून आला. चीनचा शांघाय कंपोजिट 0.४७ टक्क्यांनी, हाँगकाँगचा हँग सेंग 0.८२ टक्क्यांनी घसरला. जपानचा निक्केई मात्र 0.२६ टक्क्यांनी वर चढला.
शेअर बाजार तीन महिन्यांच्या नीचांकावर
जागतिक पातळीवरील नरमाईचा कल यामुळे सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १४४ अंकांनी घसरून ३ महिन्यांच्या नीचांकावर गेला.
By admin | Published: October 18, 2016 06:35 AM2016-10-18T06:35:59+5:302016-10-18T06:35:59+5:30