Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर बाजार दुस-या दिवशीही तेजीत

शेअर बाजार दुस-या दिवशीही तेजीत

भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी अनुभवली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७८.३५ अंकांनी वाढून

By admin | Published: February 12, 2015 12:18 AM2015-02-12T00:18:28+5:302015-02-12T00:18:28+5:30

भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी अनुभवली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७८.३५ अंकांनी वाढून

Stock markets rally on second day | शेअर बाजार दुस-या दिवशीही तेजीत

शेअर बाजार दुस-या दिवशीही तेजीत

मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी अनुभवली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७८.३५ अंकांनी वाढून २८,५३३.९७ अंकांपर्यंत पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१.८५ अंकांनी वाढून ८,६२७.४0 अंकांवर बंद झाला.
जागतिक बाजारातील मजबुतीचा लाभ बाजारांना मिळाला. बाजार दिवसभर तेजी दर्शवीत होते. भांडवली वस्तू, धातू, ऊर्जा, बँकिंग आदी क्षेत्रांतील कंपन्यांना तेजीचा लाभ झाला. स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक अनुक्रमे १.४७ टक्का आणि १.५५ टक्का वाढले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचे पहिले पूर्ण बजेट या महिन्याच्या अखेरीस मांडले जाणार आहे. त्याबद्दल बाजारात उत्सुकता आहे. आर्थिक सुधारणांना पुढे नेण्यासाठी हे बजेट साह्यभूत ठरेल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बाजार तेजीत आला आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सकाळी २८,४५0.२६ अंकांवर तेजीसह उघडला. २८,६१८.९१ आणि २८,४२४.३९ अंकांच्या मध्ये तो दिवसभर खाली-वर होताना दिसत होता. सत्रअखेरीस २८,५३३.९७ अंकांवर बंद होताना १७८.३५ अंकांची वाढ त्याने नोंदविली. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने ३0६.५८ अंकांची अथवा १.0९ टक्क्याची वाढ नोंदविली. ५0 कंपन्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६१.८५ अंकांनी अथवा 0.७२ अंकाने वाढून ८,६२७.४0 अंकांवर बंद झाला. (वृत्तसंस्था)

Web Title: Stock markets rally on second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.