Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची गटांगळी

सेन्सेक्सची गटांगळी

हजार-पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका शेअर बाजारांना बसला असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१४ पेक्षा जास्त

By admin | Published: November 16, 2016 12:33 AM2016-11-16T00:33:29+5:302016-11-16T00:33:29+5:30

हजार-पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका शेअर बाजारांना बसला असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१४ पेक्षा जास्त

Stocking of Sensex | सेन्सेक्सची गटांगळी

सेन्सेक्सची गटांगळी

मुंबई : हजार-पाचशेच्या नोटा व्यवहारातून बाद करण्याच्या निर्णयाचा फटका शेअर बाजारांना बसला असून, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५१४ पेक्षा जास्त अंकांनी घसरून ६ महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. सेन्सेक्स सकाळीच
नरमाईसह उघडला होता.
नंतर त्यात आणखी घसरण झाली. सत्र अखेरीस ५१४.१९ अंकांची अथवा १.९२ टक्क्यांची घसरण नोंदवून, तो २६,३0४.६३ अंकांवर बंद झाला. २५ मे रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. शुक्रवारी सेन्सेक्स ६९८.८६ अंकांनी घसरला होता.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १८७.८५ अंकांनी अथवा २.२६ टक्क्यांनी घसरून ८,१0८.४५ अंकांवर बंद झाला. २७ जून नंतरची ही नीचांकी पातळी ठरली. व्यापक बाजारांतही घसरणीचा कल दिसून आला. सेन्सेक्समधील कंपन्यांत टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक ९.८८ टक्क्यांनी घसरला.


कारागीर निघाले घराकडे-
जळगावात पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजराथ येथील सुवर्ण कारागीर बालाजीपेठ, जुने जळगाव, गोलाणी मार्केट, महात्मा गांधी मार्केटसह शहरातील विविध भागांत वास्तव्याला आहेत. बहुतांश कारागीर हे काही दिवसांपूर्वी दिवाळीला गावाला जाऊन आले होते. मात्र, सध्या कामधंदा नसल्याने, पुन्हा काही कारागीर कुटुंबासह घराकडे निघत आहेत.
 

Web Title: Stocking of Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.