Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'नाव तर ऐकलंच असेल'; 'त्या' पद्मिनीची कहाणी, मुंबईत ज्याचं मीटर कायमचं झालं 'डाऊन'

'नाव तर ऐकलंच असेल'; 'त्या' पद्मिनीची कहाणी, मुंबईत ज्याचं मीटर कायमचं झालं 'डाऊन'

मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. मुंबईचा विचार केला, तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं कोणतं चित्र उभं राहतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 10:13 AM2023-10-30T10:13:42+5:302023-10-30T10:14:16+5:30

मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. मुंबईचा विचार केला, तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं कोणतं चित्र उभं राहतं?

story of black yellow taxi mumbai primer padmini closed forever know success | 'नाव तर ऐकलंच असेल'; 'त्या' पद्मिनीची कहाणी, मुंबईत ज्याचं मीटर कायमचं झालं 'डाऊन'

'नाव तर ऐकलंच असेल'; 'त्या' पद्मिनीची कहाणी, मुंबईत ज्याचं मीटर कायमचं झालं 'डाऊन'

मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. मुंबईचा विचार केला, तर आपल्या डोळ्यासमोर पहिलं कोणतं चित्र उभं राहतं? ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडिया किंवा मरीन ड्राइव्ह. पण मुंबईतील काळी पिवळी टॅक्सी हीदेखील अनेक दशकांपासून मुंबईची ओळख आहे. ज्यांनी मुंबई पाहिली नाही, त्यांनी चित्रपटांमध्ये तर नक्कीच काळी पिवळी टॅक्सी पाहिली असेल. पण आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाहीत. या टॅक्सीचा ६० वर्षांचा प्रवास रविवारी संपला.

२० वर्ष पूर्ण
प्रीमियर पद्मिनी या नावानं प्रसिद्ध असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचा रविवार हा शेवटचा दिवस होता. परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार, शेवटच्या पद्मिनी कारची नोंदणी २९ ऑक्टोबर २००३ रोजी झाली होती. मुंबईत टॅक्सींसाठी २० वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी मुंबईत या टॅक्सींचा निश्चित केलेला कालावधी संपला. आता मुंबईच्या रस्त्यावर काळ्या-पिवळ्या पद्मिनी टॅक्सी दिसणार नाहीत.

१९६४ मध्ये सुरू झाला प्रवास
मुंबईची ही काळी पिवळी टॅक्सी म्हणजे प्रीमिअर पद्मिनी कार. प्रीमियर पद्मिनीचा प्रवास १९६४ साली सुरू झाला. त्यावेळी पद्मिनी कारचं मॉडेल Fiat-1100 Delight हे होतं. ती एक शक्तिशाली १२०० सीसी कार होती. स्थानिक लोक याला डुक्कर फिअॅट (Dukkar Fiat) असंही म्हणतात. इटालियन ब्रँडची ही कार प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेडनं भारतात तयार केली होती. १९७० मध्ये त्याचं नाव बदलून प्रीमियर प्रेसिडेंट करण्यात आलं. नंतर राणी पद्मिनीच्या नावावरून प्रीमियर पद्मिनी असं नाव बदलण्यात आलं. कंपनीनं २००१ मध्ये या कारचं उत्पादन बंद केलं.

दोनच कार्सचं वर्चस्व
स्वातंत्र्यानंतर देशात दोनच कार्स खूप लोकप्रिय झाल्या. एक हिंदुस्थान मोटर्सची अॅम्बेसेडर आणि दुसरी प्रीमियर ऑटोची पद्मिनी कार होती. ही एक रफ अँड टफ कार होती. त्याचं इंजिन लहान असायचं. त्यामुळे त्याची देखभाल खूप सोपी होती. ही कार ताशी १२५ किलोमीटर वेगाने धावू शकायची. मुंबईत सध्या ४० हजारांहून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सी होत्या, ज्या आता बंद करण्यात आल्या आहेत. १९९० च्या दशकात ही संख्या ६० हजार होती. १९६० च्या दशकात दिल्ली आणि कोलकाता येथे अॅम्बेसेडर कारचा दबदबा होता. त्याच वेळी पद्मिनी टॅक्सीनं मुंबईवर राज्य केलं.

लाल बहादुर शास्त्रींनी घेतलेलं कर्ज
साधारण १९६४ सालची गोष्ट आहे. लाल बहादूर शास्त्रींना ही कार घ्यायची होती. पण त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. कारची किंमत १२ हजार रुपये होती आणि शास्त्री यांच्याकडे फक्त ७ हजार रुपये होते. ही कार घेण्यासाठी शास्त्री यांना पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं. मात्र, कर्जाची परतफेड करण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं आणि उर्वरित कर्ज त्यांच्या पत्नीने फेडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार रजनीकांत देखील या कारचे चाहते आहेत. रजनीकांत यांची पहिली कार पद्मिनी होती, जी आजही त्यांच्याकडे आहे.

Web Title: story of black yellow taxi mumbai primer padmini closed forever know success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई