अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटी कायद्यांंतर्गत केंद्र सरकारतर्फे कोरोना प्रकोपामुळे व्यापाऱ्यांना कोणत्या सवलती देण्यात आल्या आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, जीएसटीअंतर्गत केंद्र सरकारने 0१ मे रोजीच्या केंद्रीय कर अधिसूचनेद्वारे विविध अनुपालनांच्या तारखा वाढविल्या आहेत. करदात्याला एप्रिलचा जीएसटीआर-१ रिटर्न दाखल करण्यासाठी ११ मेच्या मूळ तारखेची मुदतवाढ करून २६ मेपर्यंत दिली आहे. तसेच क्यूआरएमपी योजनेत रिटर्न दाखल करण्याची निवड केलेल्या करदात्यांसाठी देय तारीख १३ मे होती, जी आता २८ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
अर्जुन : मार्च आणि एप्रिल महिन्याच्या जीएसटीआर-३बी व इतर रिटर्नसाठी वाढीव तारीख कोणती आहे?
कृष्ण : मार्च महिन्यात जीएसटीआर-३बी दाखल करण्याच्या नव्या (वाढवून मिळालेल्या) तारखा खालीलप्रमाणे : १) ५ कोटीपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणाऱ्या करदात्यांसाठी - ५ मे. २) ५ कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या करदात्यांसाठी - २0 मे
एप्रिलच जीएसटीआर-३बी भरण्याच्या नव्या तारखा खालीलप्रमाणे : १) ५ कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या करदात्यांसाठी - ४ जून २) ५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या करदात्यांसाठी ( क्यूआरएमपीची निवड न केलेले)- १९ जून, क्यूआरएमपीची निवड केलेल्या करदात्यांसाठी जीएसटीआर-३बी शेवटच्या तिमाहीसाठी तारीख- २४ मे, जीएसटीआर-४ साठी- ३१ मे
अर्जुन : वरील लाभ घेण्यासाठी व्याज आणि विलंब शुल्कात काही सवलत आहे का?
कृष्ण : विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. करदात्यांची उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त असेल तर व्याज मात्र द्यावे लागेल. १) मार्चचे रिटर्न ५ मेपर्यंत- ९ टक्के व्याज, त्यानंतर - १८ टक्के व्याज. २) एप्रिलचे रिटर्न ४ जूनपर्यंत -९ टक्के व्याज, त्यानंतर १८ टक्के व्याज.
५ कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या करदात्यांसाठी : १) मार्चचे रिटर्न - ५ मेपर्यंत तर व्याज नाही. २0 मे पर्यंत- ९ टक्के, २0 मेनंतर -१८ टक्के. २) एप्रिलचे रिटर्न- ४ जूनपर्यंत व्याज नाही. १९ जूनपर्यंत-९ टक्के, १९ जूननंतर-१८ टक्के.
करदात्यांनी वाढविलेल्या मुदतीमध्ये लवकरात लवकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.
- उमेश शर्मा
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहेत)