Join us

करनीती: जीएसटी छाननीचे मापदंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 7:39 AM

GST : रिटर्नची तपासणी करण्यासाठी जीएसटी विभागाने तयार केलेले विविध मापदंड कोणते आहेत? जाणून घ्या...

- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउण्टण्ट 

करनीती या साप्ताहिक स्तंभाचा हा चारशेवा भाग आहे. सर्व वाचकांचे मनापासून आभार!!!     अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये रिटर्नची पडताळणी करण्यासाठी वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर आधारित नोटिसा का दिल्या जात आहेत?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, कलम ६१ नियम ९९नुसार फॉर्म GST ASMT-१० नुसार स्पष्टीकरण मागवले जात आहेत.अर्जुन : रिटर्नची तपासणी करण्यासाठी जीएसटी विभागाने तयार केलेले विविध मापदंड कोणते आहेत?कृष्ण : एकूण १५ मापदंड आहेत :१) ज्या करदात्यांचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द झाली आहेत. २) जीएसटीआर-०९/जीएसटीआर-३बीच्या तुलनेत जीएसटीआर-०१ मध्ये जास्तीचा आउटपूट कर आहे. ३) जीएसटीआर-३बीच्या तुलनेत ई-वे बिलामध्ये जास्तीचा आउटपुट कर. ४) ज्यांनी जीएसटीआर-३बी नॉन फायलिंगकडून अपात्र असलेला आयटीसी क्लेम केला. ५) जीएसटीआर-०९/जीएसटीआर-३बी मध्ये अतिरिक्त आयटीसीचा दावा केला आहे जो जीएसटीआर-२ए किंवा जीएसटीआर-०९ च्या ८ए मध्ये कनफर्म नाही. ६) अपात्र आयटीसी क्लेम केला, त्या पुरवठादाराकडून ज्याचा आरसी रद्द केला आहे. ७) जीएसटीआर-०८ (टीसीएस) च्या तुलनेत जीएसटीआर-०१मध्ये कमी उलाढाल दाखवल्यास. ८) जीएसटीआर-०७ (टीडीएस)च्या तुलनेत जीएसटीआर-३बीमध्ये कमी उलाढाल दाखवल्यास. ९) जीएसटीआर-०१ च्या तुलनेत जीएसटीआर-०९/३बी/४ आरसीएमची कमी लायबिलिटी दाखवल्यास. १०) कलम १६(४) जीएसटीआर-३बीनुसार आयटीसीचा लाभ घेण्याच्या शेवटच्या तारखेनंतर केल्यास. ११) जीएसटीआर-०१मध्ये पुरवठादाराव्दारे अपलोड केलेल्या खरेदी इनव्हाईस आयटीसी कलम १६(४)च्या शेवटच्या तारखेनंतर दाखल केल्यास. १२) जीएसटीआर-३बी उशिरा दाखल झाल्यास १३) जीएसटीआर-६ई विरुद्ध ICEGATE डेटामध्ये दाखवलेल्या अतिरिक्त आयजीएसटी. १४) जीएसटीआर-०९ जीएसटीआर-६जीविरुद्ध जीएसटीआर-२ए ISD आयटीसीचा लाभ. १५) जीएसटीआर-०९ ४जीमध्ये दाखवलेल्या लायबिलिटीपेक्षा जास्त आरसीएम आयटीसी जीएसटीआर-०९ ६CDF मध्ये दाखवल्यास.अर्जुन : अधिकाऱ्यांकडून काय कारवाई केली जाईल?कृष्ण : कारवाईसाठी नोटीस बजावण्यात येईल.

टॅग्स :जीएसटीव्यवसाय