Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनीती भाग ३३६ - जीएसटी चलनातील चुका कशा दुरुस्त कराल?

करनीती भाग ३३६ - जीएसटी चलनातील चुका कशा दुरुस्त कराल?

अंतिम तारखेनंतर सुधारणा केल्यानंतर त्यावर व्याज भरावे लागणार नाही. कारण इंटरहेड अ‍ॅडजेस्टमेंटमुळे महसुलाचे नुकसान होत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:50 AM2020-05-04T01:50:57+5:302020-05-04T01:51:16+5:30

अंतिम तारखेनंतर सुधारणा केल्यानंतर त्यावर व्याज भरावे लागणार नाही. कारण इंटरहेड अ‍ॅडजेस्टमेंटमुळे महसुलाचे नुकसान होत नाही.

Strategy Part 336 - How to correct errors in GST challan? | करनीती भाग ३३६ - जीएसटी चलनातील चुका कशा दुरुस्त कराल?

करनीती भाग ३३६ - जीएसटी चलनातील चुका कशा दुरुस्त कराल?

अर्जुन : कृष्णा, जीएसटीचे चलन तयार करताना चुकीच्या पद्धतीने पैसे भरण्यापासून अनेक चुका होतात. लॉकडाउन काळात करदात्यास रोखतेची कमी भासत आहे. चुका झाल्यास पैसे अडकून राहतात. त्यामुळे समस्या वाढतात. सरकारने या चुका सुधारण्यासाठी कोणते पाऊल उचलले आहे ?

कृष्ण : अर्जुना, जीएसटी पीएमटी -०९ हा अर्ज कॅश लेजरद्वारे चुकीच्या पेमेंटने केलेल्या फंडाचे रिअ‍ॅलोकेशन करण्यासाठी जारी केला आहे. सीजीएसटीऐवजी एसजीएसटीमध्ये पेमेंट केले असल्यास अशा चुका या अर्जामध्ये सुधारल्या जाऊ
शकतात.

जीएसटी पीएमटी-०९ हा अर्ज सरकारने २१ एप्रिल २०२० रोजी जारी केला आहे. त्याद्वारे करदाते जीएसटीचे चलन भरताना केलेल्या चुकांना सुधारू शकतात. हा अर्ज २८ जून २०१९ रोजी जाहीर केला होता. मात्र, आतापासून हा अर्ज वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी पीएमटी -०९ हा अर्ज कोण भरू शकतो?

कृष्ण : अर्जुना, कोणताही करदाता जीएसटी पीएमटी अर्ज भरू शकतो. हा अर्ज जीएसटीएनच्या पोर्टलवर उपलब्ध आहे. करदाते पेमेंट करताना झालेल्या चुका त्याद्वारे सुधारू शकतात. जीएसटीआर-३ बी भरताना चुकीचा कराचा दावा केल्यास हा अर्ज उपयोगात आणता येणार नाही, याची नोंद करदात्यांनी घ्यावी. हा अर्ज केवळ कॅश लेजरमध्ये असलेल्या करांच्या रकमेत बदल करण्यासाठी अनुमती देतो. एकदा रकमेचा वापर केल्यानंतर त्यामध्ये कोणतीही दुरुस्ती केली जाऊ शकत नाही. अशाप्रकारे जीएसटी पीएमटी ०९ मधून एकच समस्या सोडवली जाऊ शकते. ती म्हणजे चुकीच्या हेड अंतर्गत केलेले पेमेंट.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी पीएमटी ०९ मधील महत्त्वाचे मुद्दे कोणते?
कृष्ण : अर्जुना, जीएसटी पीएमटी ०९ हा अर्ज भरताना करदात्यांनी खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत -
१ ) जीएसटीआर ३ बीमध्ये जर चुकीचे चलन वापरले गेले असल्यास पीएमटी ०९ हा अर्ज उपयोगात येणार नाही.
२ ) जीएसटीआर ३बी हे बदलता येत नाही. हा अर्ज केवळ कॅश लेजरमधील रकमेचे रिअ‍ॅलोकेशन करण्यासाठीच वापरला जाऊ शकतो.
३) कोणतेही चलन वापरण्यापूर्वी, करण्यापूर्वी त्यामधील चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा अर्ज वापरता येईल.
४) अंतिम तारखेनंतर सुधारणा केल्यानंतर त्यावर व्याज भरावे लागणार नाही. कारण इंटरहेड अ‍ॅडजेस्टमेंटमुळे महसुलाचे नुकसान होत नाही.
अर्जुन : कृष्णा, जीएसटी पीएमटी ०९ अर्ज भरण्याची पद्धत आणि त्या संबंधीची सूचना काय आहे?
कृष्ण : अर्जुना, करदात्यास खालील सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे -
१ ) जीएसटीतील मेजर हेड म्हणजे इंटिग्रेटेड टॅक्स, स्टेट-यूटी टॅक्स आणि सेस.
२) मायनर हेड म्हणजे व्याज, विलंब आकार, दंड.
३) पीएमटी-०९ द्वारे एका मेजर-माइनर हेड अंतर्गत केलेले चुकीचे पेमेंट दुसऱ्या मेजर-माइनर हेडमध्ये वर्ग करता येईल.
४) एका माइनर हेडमधील रक्कम दुसºया माइनर हेडमध्ये एकाच मेजर हेड अंतर्गत शिफ्ट करता येईल.
अर्जुन : यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, करदात्यांनी हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे की जीएसटी पीएमटी ०९ हा अर्ज केवळ कॅश लेजरमधील रकमेचे रिअ‍ॅलोकेशन करण्यासाठी आहे.
आयटीसी चुकीच्या पद्धतीने वापरल्यास त्याची सुधारणा या अर्जाद्वारे करता येणार नाही. जीएसटीआर ३ बी बदलता येत नाही. त्यामुळे हा अर्ज जीएसटीआर ३ बीमध्ये झालेल्या चुकांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
जीएसटीआर ३ बीमधील चुकीच्या माहितीमधून बाहेर पडण्यासाठी कोणताही उपाय नाही.

पीएमटी ०९ भरण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे :
आपला लॉग-इन आयडी वापरून जीएसटीच्या संकेतस्थळावर लॉग-इन करावे.
सेवा-लेजर- इलेक्ट्रॉनिक कॅश लेजरवर जावे.
फाइल जीएसटी पीएमटी ०९ वर क्लिक करा.
आवश्यक सुधारणा करून सेव्ह बटन क्लिक करावे.
व्ह्यू फाइल जीएसटी पीएमटी ०९ वर क्लिक करा आणि दाखल केलेला पीएमटी-०९ फॉर्म पाहा.

 

Web Title: Strategy Part 336 - How to correct errors in GST challan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी