Lokmat Money > बिझनेस न्यूज > करनीती भाग ३४४: जीएसटी तारीख कभी खुशी, कभी गम

करनीती भाग ३४४: जीएसटी तारीख कभी खुशी, कभी गम

अर्जुन : कृष्णा, ज्या करदात्यांनी पूर्वीपासूनच जीएसटीआर ३ बी दाखल केला नाही, त्यांना काय दिलासा देण्यात आला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 11:24 PM2020-06-28T23:24:56+5:302020-06-28T23:25:14+5:30

अर्जुन : कृष्णा, ज्या करदात्यांनी पूर्वीपासूनच जीएसटीआर ३ बी दाखल केला नाही, त्यांना काय दिलासा देण्यात आला?

Strategy Part 344: GST date sometimes happy, sometimes sad | करनीती भाग ३४४: जीएसटी तारीख कभी खुशी, कभी गम

करनीती भाग ३४४: जीएसटी तारीख कभी खुशी, कभी गम

उमेश शर्मा,सीए  

अर्जुन : कृष्णा, ४० व्या जीएसटी बैठक परिषदेत काही प्रमुख शिफारशी करण्यात आल्या. या शिफारशींचा परिणाम म्हणून सीबीआयसीने कोणती पावले उचलली आहेत?
कृष्ण : अर्जुना, ४०व्या जीएसटी बैठक परिषदेचा परिणाम म्हणून, सीबीआयसीने २४ जून २०२० रोजी एक जीएसटी सूचना, दोन आयजीएसटी अधिसूचना, सहा सीजीएसटी अधिसूचना, एक युटीजीएसटी अधिसूचना जारी केल्या. वेगवेगळे स्लॅब, उशिरा भरले जाणारे शुल्क, महिने, शेवटची तारीख या सर्वांमुळे करदाते गोंधळून गेले आहेत.
अर्जुन : कृष्णा, जाहीर केलेल्या अधिसूचना नक्की काय सांगतात?
कृष्ण : ज्या करदात्यांची पाच कोटी रुपयापर्यंत उलाढाल आहे आणि त्यांनी मे ते जुलै २०२० साठीचा परतावा दिलेल्या तारखांच्या आत दाखल केल्यास त्यावरील ९ टक्क्यांहून अधिक व्याजदर काही अटींसह माफ होईल. तसेच, पाच कोटीपर्र्यंत उलाढाल असलेल्या करदात्यांनी मे ते जुलै २०२० या महिन्यासाठी परतावा दिलेल्या तारखांमध्ये दाखल केल्यास त्यावरील विलंब आकार (लेट फी) माफ होईल. करदात्यांनी जर जीएसटीआर-१ मार्च ते जून २०२० या महिन्यांसाठी दिलेल्या तारखांमध्ये दाखल केल्यास विलंब आकार अटींसह माफ केला जाईल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांना दिलासा म्हणून, जीएसटीएआर ३-बी चा तपशील देण्यासाठी शेवटच्या वाढीव तारखा काय आहेत?
कृष्ण : मागील आर्थिक वर्षात पाच कोटींपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या करदात्यांसाठी मे महिन्यासाठीच्या रिटर्नची शेवटची तारीख २७ जून २०२० होती. तर व्यवसायाचे मुख्य स्थान महाराष्ट्र असलेल्या आणि मागील वषार्ची उलाढाल पाच कोटी पर्यंत असलेल्या करदात्यांसाठी मे महिन्यासाठी १२ सप्टेंबर, जूनसाठी २३ सप्टेंबर, जुलैसाठी २७ सप्टेंबर आणि आॅगस्टसाठी १ आॅक्टोबर २०२० असेल.
अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, या सर्व अधिसूचना आणि स्पष्टीकरणानंतर काही मुद्दे अजूनही स्पष्ट झाले नाहीत. जसे फेब्रुवारी आणि त्यानंतरच्या महिन्यांसाठी जीएसटीआर ३ बी
दाखल केले नाही तर काय? ज्या करदात्यांची उलाढाल ५ कोटींपेक्षा जास्त आहे, त्यांना मे ते सप्टेंबर
२०२० या महिन्यांसाठी व्याजदरात काहीही सूट दिलेली नाही. शेवटच्या तारखांमधील गोंधळामुळे हा ‘गुड आणि सिंपल टॅक्स’ आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.
अर्जुन : कृष्णा, ज्या करदात्यांनी पूर्वीपासूनच जीएसटीआर ३ बी दाखल केला नाही, त्यांना काय दिलासा देण्यात आला?
कृष्ण : अर्जुना, जुलै २०१७ ते जानेवारी २०२० या महिन्यांसाठीचे नील जीएसटीआर ३ बी ज्या करदात्यांनी दाखल केले नाहीत त्यांचा विलंब आकार माफ करण्यात येईल, मात्र त्यांनी १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० दरम्यान रिटर्न दाखल केले पाहिजे. टॅक्स लॅबिलिटी आहे, मात्र ज्यांनी जुलै २०१७ ते जानेवारी २०२० या महिन्यांसाठीचे रिटर्न दाखल केले नाही, अशांनी १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत ते दाखल केल्यास त्यांना पाचशे रुपयांवरील विलंब आकार माफ होईल.

Web Title: Strategy Part 344: GST date sometimes happy, sometimes sad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :GSTजीएसटी