Join us  

क्रिप्टो एक्सचेंजवर कर चोरीप्रकरणात कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:29 AM

जैनमाय लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सर्वात मोठी चोरी उघडकीस आली आहे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जीएसटी चोरी प्रकरणात क्रिप्टो एक्सचेंजेसवर मोठी कारवाई केली आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चोरी प्रकरणात सरकारने ११ क्रिप्टो एक्सचेंजेसकडून व्याज आणि दंडासह एकूण ९५.८१ कोटी रुपये वसूल केले आहेत. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारकडे देशातील क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या संख्येबाबत काही डेटा आहे का, असे विचारले असता चौधरी म्हणाले, केंद्र असा डेटा गोळा करत नाही. विभागाला क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजद्वारे जीएसटी चुकविण्याची काही प्रकरणे आढळली आहेत.

जैनमाय लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सर्वात मोठी चोरी उघडकीस आली आहे. हे वझीरएक्स ब्रँड अंतर्गत काम करते. त्यांनी ४०.५१ कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला होता. त्यांच्याकडून ४९.१८ कोटी रुपये वसूल करण्यात आले. यासह कॉईन डीसीएक्स, ब्यूयूकॉईन, कॉईनस्विच कुबेर, युनोकॉईन, फ्लिटपे, झेब आयटी सर्व्हिस, जिओटूस यासह काही एक्सचेंजनी जीएसटी कर चोरी केली आहे.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीअर्थव्यवस्थाकर