Join us  

मजबूत आणि टिकाऊ स्मार्टफोन, पाण्यात बुडवा, जमिनीवर आपटा काहीच होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 5:49 PM

Doogee Smini Mobile: सध्या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनची क्रेझ दिसून येत आहे. त्याचा आकार तर लहान असतो. मात्र परफॉर्मन्स जबरदस्त असतो. चीनमधील फोन कंपनी Doogee ने एक जबरदस्त फिचर्स असलेला एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आणला आहे.

सध्या कॉम्पॅक्ट स्मार्टफोनची क्रेझ दिसून येत आहे. त्याचा आकार तर लहान असतो. मात्र परफॉर्मन्स जबरदस्त असतो. चीनमधील फोन कंपनी Doogee ने एक जबरदस्त फिचर्स असलेला एक कॉम्पॅक्ट स्मार्टफोन आणला आहे. याचं नाव आहे Doogee Smini. हा फोन आकाराने लहान असला तरी खूप टिकाऊ, मजबूत आणि रेट्रो स्टाईलमध्ये येतो. या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत आपण आज जाऊन घेउयात. 

Doogee Smini हा एक लहान आणि हलका स्मार्टफोन आहे. तो तुमच्या खिशामध्ये सहजपणे मावतो. त्यामध्ये ४.५ इंचांचा आयपीएस पॅनल आहे, त्याचं रिझॉल्युशन १,१७० बाय ४८० पिक्सल आहे. हा फोन Apple iPhone 13 Mini च्या तुलनेत खूप लहान आहे, त्यामुळे तो पॉकेट फ्रेंडली फोन बनला आहे.

हा केवळ लहान आणि वजनाने हलकाच नाही तर बऱ्यापैकी टिकावू आहे. यामध्ये आयपी६८ आणि आयपी६९K सर्टिफिकेशन आहे. त्याचा अर्थ म्हणजे हा फोन केवळ धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. तसेच तो इतर आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठीही सक्षम आहे. या फोनच्या समोर ८ एपमी कॅमेरा आहे. उजवीकडे फिंगरप्रिंट सेंटर डावीकडे आहे. फोनमध्ये ५० एमपीचा प्रायमरी कॅमेरा आहे आणि २ एमपीचा सेकंडरी कॅमेरा आहे. या मीडियाटेक हेलियो जी९९ प्रोसेसरद्वारा संचालित आहे. जो ८ कोअरवाला प्रोसेसर आहे, जो २.० GHz पर्यंतच्या गतीपर्यंत पोहोचू शकतो. या प्रोसेसरला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत जोडण्यात आलं आहे.

हा ३०००mAh च्या बॅटरीने लेस आहे. जो सामान्य उपयोगासाठी एका दिवसापेक्षा अधिक चालू शकते. याला यूएसबी-सी पोर्टच्या माध्यमातून १८डब्ल्यू पर्यंतच्या फास्ट चार्जिंगसह चार्ज केला जाऊ शकतो. हा ३.५ मिमी हेडफोन जॅकसह येतो. जो वायर्ड हेडफोनचा उपयोग करणाऱ्या लोकांना एक चांगला पर्याय आहे.

Doogee Smini आता AliExpress वर उपलब्ध आहे. या फोनची किंमत वेगवेगळी असू शकते. याची किंमत शिपिंग कॉस्ट, इम्पोर्ड ड्युटी आणि लोकेशनमुळे अधिक असू शकते.  

टॅग्स :मोबाइलव्यवसायस्मार्टफोनचीन