टेलिकॉम कंपन्या यूजर्सना आकर्षित करण्यासाठी अनेक उत्तम प्लॅन्स ऑफर करत आहेत. यापैकी काही प्लॅन्स असेही आहेत, ज्यात OTT अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनही दिले जात आहे. अधिक दैनंदिन डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह पॉप्युलर OTT अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळत असलेल्या प्लॅन्सकडे आजकाल अनेकांचा कल आहे. Airtel, Jio आणि Vodafone-Idea (Vi) च्या अशाच काही प्लॅन्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. या प्लॅन्समध्ये, तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचे एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन आणि दररोज 3GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो.
एअरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन
एअरटेलचा हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 3 जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय कंपनी देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर दररोज 100 मोफत एसएमएससह अमर्यादित कॉलिंगची ऑफर देत आहे. याव्यतिरिक्त डिस्ने + हॉटस्टार मोबाईल एडिशनचे फ्री सब्सक्रिप्शनही या प्लानमध्ये एका वर्षासाठी दिले जात आहे. प्लॅनमध्ये, कंपनी 30 दिवसांसाठी Amazon Prime Video च्या मोबाइल एडिशनचं फ्री ट्रायलही ऑफर करत आहे.
एअरटेलचा 838 रुपयांचा प्लॅन
कंपनीचा हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा मिळेल. प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 मोफत एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. याशिवाय अतिरिक्त फायद्यांमध्ये डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल एडिशनचं एका वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शही देण्यात येतं. याशिवाय Amazon प्राइम व्हिडीओ मोबाइल एडिशनचं फ्री ट्रायल दिलं जातं.
जिओचा 601 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा मिळतो. कंपनी या प्लानमध्ये 6 GB अतिरिक्त डेटा देखील देत आहे ज्याची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटे़ड कॉलिंग फायदे देखील मिळतील. या प्लॅनमध्ये कंपनी डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन सोबत एक वर्षासाठी Jio अॅप्सचंही मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.
जिओचा 799 रुपयांचा प्लॅन
56 दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसोबत 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. ग्राहकांसाठी कंपनी या प्लॅनमध्ये Disney + Hotstar चे एका वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल.
Vi चा 601 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा मिळेल. प्लॅनची खास गोष्ट म्हणजे कंपनी Disney + Hotstar च्या फ्री सब्सक्रिप्शनसह 16 GB मोफत अतिरिक्त डेटा देत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Data Delight यांचा समावेश आहे.
Vi चा 901 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये कंपनी 70 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा ऑफर करते. प्लॅनमध्ये 48GB अतिरिक्त डेटासह Disney+ Hotstar चं एका वर्षासाठी सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. इतर प्लॅन्सप्रमाणे, दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभही या प्लॅनसह दिला जात आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त फायदे 601 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच आहेत.