Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्सची जोरदार उसळी

सेन्सेक्सची जोरदार उसळी

जागतिक बाजारातील तेजी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या बळावर भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७६ अंकांनी वाढून

By admin | Published: May 26, 2016 02:05 AM2016-05-26T02:05:08+5:302016-05-26T02:05:08+5:30

जागतिक बाजारातील तेजी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या बळावर भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७६ अंकांनी वाढून

Strong rally of the Sensex | सेन्सेक्सची जोरदार उसळी

सेन्सेक्सची जोरदार उसळी

मुंबई : जागतिक बाजारातील तेजी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या बळावर भारतीय शेअर बाजारांनी बुधवारी जोरदार उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५७६ अंकांनी वाढून २५,८८१.१७ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सची ही गेल्या तीन महिन्यांतील सर्वांत मोठी उसळी ठरली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने ७,९00 अंकांचा टप्पा ओलांडला.
सेन्सेक्स सकाळी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो सतत वाढत राहिला. एका क्षणी तो २५,८९७.८७ अंकांपर्यंत वर चढला होता. सत्राच्या अखेरीस ५७५.७0 अंकांची अथवा २.२८ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २५,८८१.१७ अंकांवर बंद झाला.

३0 पैकी २९ कंपन्यांच्या समभागांना मागणी
सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी २९ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. केवळ सिप्लाचा समभाग ४.९७ टक्क्यांनी घसरला. कंपनीची मार्चला संपलेल्या तिमाहीतील कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. त्याचा फटका कंपनीला बसला. आयसीआयसीआय बँकेचा समभाग सर्वाधिक ४.४८ टक्क्यांनी वाढला. भेल, बजाज, आॅटो, एल अँड टी, मारुती, एसबीआय, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, गेल, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, टीसीएस, आयटीसी, टाटा स्टील यांचे समभागही वाढले.

Web Title: Strong rally of the Sensex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.