Join us  

Jio पेक्षाही तगडा प्लॅन, २ रुपये अधिक देऊन दररोज ३ जीबी डेटा आणि हॉटस्टारही मिळणार मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2023 3:59 PM

कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनेक जबरदस्त फायदे देण्यात येत आहेत.

दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ग्राहकांना अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. दुसरीकडे, जर तुम्ही जास्त डेटा खर्च करत असाल, तर तुमच्यासाठी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीचा 901 रुपयांचा प्लॅन यापैकी एक आहे. हे जिओच्या 899 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 2 रुपये महाग आहे, परंतु फायद्यांच्या बाबतीत ते जिओला स्पर्धा देते. कंपनीचा 901 रुपयांचा प्लान 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 3 जीबी डेटा देत आहे. खास गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला 48 जीबी अतिरिक्त डेटाही मोफत मिळणार आहे. त्याच वेळी, जिओच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅन्समध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

कंपनी या प्लॅनमध्ये 70 दिवसांची वैधता देत आहे. इंटरनेट वापरण्यासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3 GB डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये 48GB अतिरिक्त डेटा मोफत मिळतो. याशिवाय तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक बेनिफिट्सही मिळतात.

प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये एका वर्षासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय Vodafone-Idea चा हा प्लान Binge All Night, विकेंड डेटा रोलओव्हर आणि Vi movies & TV अॅपचा फ्री ॲक्सेसही मिळतो. प्लॅनमध्ये, कंपनी डेटा डिलाइट्स बेनिफिट अंतर्गत दरमहा 2GB पर्यंत बॅकअप डेटा देखील ऑफर करते.

जिओचा ८९९ रुपयांचा प्लॅनरिलायन्स जिओचा हा प्रीपेड प्लान अनेक जबरदस्त फायदे देतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळेल. प्लॅनमध्ये कंपनी रोजच्या 2.5 GB नुसार एकूण 225 GB डेटा देत आहे. कंपनी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस देखील देत आहे. प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या अतिरिक्त फायद्यांमध्ये Jio TV आणि Jio Cinema सारख्या अॅप्सचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.

टॅग्स :रिलायन्स जिओव्होडाफोन आयडिया (व्ही)