Lokmat Money > बिझनेस न्यूज > Strongest Currency : मजबूत करन्सी रँकिंगमध्ये Dollar ही मागे पडला, रुपया टॉप १० मधूनही बाहेर

Strongest Currency : मजबूत करन्सी रँकिंगमध्ये Dollar ही मागे पडला, रुपया टॉप १० मधूनही बाहेर

जगातील सर्वात लोकप्रिय चलन असूनही, डॉलर हे मजबूत चलन नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 09:54 AM2024-01-18T09:54:42+5:302024-01-18T09:55:09+5:30

जगातील सर्वात लोकप्रिय चलन असूनही, डॉलर हे मजबूत चलन नाही.

strongest currency ranking forbes list the dollar has fallen behind the rupee is also out of the top 10 | Strongest Currency : मजबूत करन्सी रँकिंगमध्ये Dollar ही मागे पडला, रुपया टॉप १० मधूनही बाहेर

Strongest Currency : मजबूत करन्सी रँकिंगमध्ये Dollar ही मागे पडला, रुपया टॉप १० मधूनही बाहेर

Strongest currencies in the world: जगातील सर्वात लोकप्रिय चलन असूनही, डॉलर हे मजबूत चलन नाही. त्याच वेळी, मजबूत चलनाच्या बाबतीत भारताचं चलन रुपया जगातील टॉप १० रँकिंगच्याही बाहेर आहे. वास्तविक, फोर्ब्सनं मजबूत चलनांची क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत, मजबूत चलनाच्या बाबतीत डॉलर १० व्या स्थानावर आहे. जर आपण भारतीय चलन रुपयाबद्दल बोललो तर ते १५ व्या स्थानावर आहे.

सर्वात मजबूत करन्सी

फोर्ब्सच्या यादीत पहिलं स्थान कुवैती दिनारला मिळालं आहे. एक कुवैती दिनार हे ₹२७०.२३ आणि ३ डॉलर्स इतकं आहे. त्याच वेळी, एक बहरीनी दिनार ₹२२०.४ आणि २.६५ डॉलर्सच्या समान आहे. हे चलन दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत तिसरं स्थान ओमानी रियालचं आहे. हे चलन २१५.८४ रुपये आणि २.६० डॉलर्सच्या बरोबरीचं आहे. यानंतर जॉर्डनचे दिनार चलन चौथ्या स्थानावर आहे. हे चलन ११७.१० रुपये आणि १.१४ डॉलर्स इतकं आहे. पाचव्या स्थानावर जिब्राल्टर पाउंड आहे ज्याचं मूल्य १०५.५२ रुपये आणि १.२७ डॉलर्स इतकं आहे.

ब्रिटीश पौड्सचं रँकिंग सहावं आहे, ते १०५.५४ रुपये आणि १.२७ डॉलर्स इतकं आहे. सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर अनुक्रमे केमन आयलंड डॉलर, स्विस फ्रँक आणि युरो आहेत. यानंतर डॉलर मजबूत चलनाच्या यादीत १० व्या स्थानावर आहे. सध्या एक अमेरिकन डॉलर ₹ ८३.१० वर व्यवहार करत आहे.

रुपया कोणत्या स्थानी

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकन डॉलर हे जागतिक स्तरावर सर्वाधिक व्यापारासाठी वापरण्यात येणारं चलन आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बुधवारच्या विनिमय दरानुसार, रुपया ८२.९ प्रति अमेरिकन डॉलरच्या मूल्यासह १५ व्या स्थानावर आहे. फोर्ब्सनं असंही म्हटलंय की स्वित्झर्लंड आणि लिकटेंस्टीनचं चलन स्विस फ्रँक जगातील सर्वात स्थिर चलन मानलं जातं. चलनातील चढउतारांमुळे क्रमवारीत बदल शक्य आहेत.

Web Title: strongest currency ranking forbes list the dollar has fallen behind the rupee is also out of the top 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा