मुंबई : रोखीपेक्षा आर्थिक व्यवहार डिजिटल पेमेेट्सद्वारे करण्यात भारतीय मुलांना अधिक स्वारस्य असून, विद्यार्थीदशेतील मुलांनाही ब्लॉकचेन आणि एनएफटीसारख्या क्रिप्टो ॲसेट्सबद्दल शिकण्याची इच्छा असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. याशिवाय डिजिटल पेमेंट्सचे विविध ॲप्स आणि पर्यायही मुले जाणून घेत आहेत. त्यामुळे पॉकेटमनीसारख्या ॲप्सचा वापर वाढताना दिसत असल्याचे आर्थिक तज्ज्ञही अधोरेखित करत आहेत.
९३% किशोरवयीन मुलांनी डिजिटल पेमेंट्सबाबत शिकण्या बाबत स्वारस्य दाखवत उत्सुकताही दर्शवली.२२% मुलांना डिजिटल पेमेंट्स करण्या बाबत आत्मविश्वास वाटला. वापराची तयारीही दर्शवली ८०% डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध असतानाही ८०% विद्यार्थी रोजच्या खर्चासाठी प्राथमिक पर्याय रोख रकमेचाच वापरतात.७०% मुलांना ब्लॉकचेन आणि एनएफटी सारख्या क्रिप्टो ॲसेट्सबद्दल शिकण्याची इच्छा असल्याचे या देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले.९४% पालकांनी त्यांच्या मुलांना डिजिटल वॉलेट्सविषयी शिकण्यात रस असल्याचे वाटत असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले.
सर्वेक्षण कोणाचे?७वी ते १२वीत शिकणाऱ्या ६०० किशोरवयीन आणि त्यांच्या पालकांच्या प्रतिक्रियांचे विश्लेषण करण्यात आले. सर्वेक्षणात दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि पुणेसारख्या अग्रगण्य शहरांचा समावेश करण्यात आला.कोणी केले सर्वेक्षण?पॉकेटमनी ॲप मूविन आणि मॉम्सप्रेसो यांनी एकत्रितपणे आर्थिक साक्षरतेसंदर्भातील सर्वेक्षण केले सर्वेक्षणाचे उद्दिष्ट काय?आर्थिक व्यवहारांची जागा डिजिटायझेशनने घेतली असताना किशोरवयीन मुलांची आर्थिक मुद्द्यांवर किती समज आहे, हे जाणून घेणे.
भारतातील किशोरवयीन मुलांमध्ये आर्थिक साक्षरतेची गरज वाढत चालली आहे. स्वयंसहाय्यित अशा ॲप्सच्या माध्यमातून विद्यार्थी आर्थिक साक्षरतेकडे वळत आहेत. - प्रशांत सिन्हा, सह संस्थापक, मॉम्सप्रेसो