नवी दिल्ली- तुम्ही जेव्हा बँकेत एफडी ठेवता तेव्हा त्याच्या व्याजातून टीडीएस (Tax Deducted at Source) कापला जातो. जर तुम्ही बँकेत ठेवलेल्या ठेवीवर वर्षाला 10 हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल, तर तुमचा टीडीएस कट केला जातो. परंतु तुम्हाला टीडीएसच्या स्वरूपात कापली जाणारी रक्कम वाचवायची असल्यास एक पर्याय उपलब्ध आहे. टीडीएस वाचवण्यासाठी तुम्हाला फॉर्म 15 जी किंवा फॉर्म 15 एच जमा करावा लागणार आहे. हा फॉर्म प्रत्येक वर्षी जमा केला जातो.
या फॉर्मच्या माध्यमातून टीडीएसच्या माध्यमातून कापली जाणारी रक्कम तुम्ही वाचवू शकता. 60 वर्षांहून कमी वयाची व्यक्ती 15G फॉर्मसाठी पात्र आहे. परंतु त्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असायला हवा. फॉर्म भरताना सावधानता बाळगण्याचीही गरज आहे. तुम्ही या फॉर्ममध्ये चुकीची माहिती दिली, तर तुमचं नुकसानही होऊ शकतं. फॉर्म भरणा-याकडे पॅन नंबर असणं आवश्यक आहे. तसेच ठेवीतील रकमेवरील व्याज काही प्रमाणात कमी असले पाहिजे.
तर फॉर्म 15Hसाठी 60 वर्षं किंवा त्याहून जास्त वयाचीही व्यक्तीही पात्र असते. फॉर्म 15Gमध्ये चुकीची माहिती भरल्यास प्राप्तिकर विभाग कलम 277 अंतर्गत तुम्हाला दंडही ठोठावू शकतो. तसेच तीन महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत तुम्हाला शिक्षा होऊ शकते. टॅक्स चोरीची रक्कम वाढल्यानंतर तुमच्या दंडातही वाढ होऊ शकते. जर तुम्ही 25 लाखांहून अधिक टॅक्स चोरी केली, तर तुम्हाला 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.
फिक्स्ड डिपॉझिटवरचा TDS वाचवणं सोप्पं; जाणून घ्या कसं?
तुम्ही जेव्हा बँकेत एफडी ठेवता तेव्हा त्याच्या व्याजातून टीडीएस (Tax Deducted at Source) कापला जातो.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:34 PM2018-10-30T12:34:27+5:302018-10-30T12:35:59+5:30