नवी दिल्ली : मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्यन यांनी कार्यकाल पूर्ण होण्याआधीच सरकारला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी निराश झालो असलो तरी आश्चर्यचकित मात्र झालेलो नाही, असे प्रतिपादन माजी केंद्रीय वित्तमंत्री तथा ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले आहे.या राजीनाम्याबाबत चिदंबरम यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, ‘अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सुब्रमण्यन यांचा सल्लाच घेतला गेलेला नाही. नोटाबंदीचा निर्णय घेण्याआधी मुख्य आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेण्यात आला नव्हता, हे काही आता रहस्य राहिलेले नाही.जीएसटीचे दर काय असावेत तसेच महसूल निरपेक्ष दर (आरएनआर) याबाबतचे त्यांचे मत निर्दयीपणे बाजूला सारण्यात आले होते. त्यामुळेच आमच्या हाती आलेला प्राणी अजिबात जीएसटी नाही, अशी टीका त्यांनी टिष्ट्वटमध्ये केली आहे.
सुब्रमण्यन यांचा राजीनामा अपेक्षितच!- पी. चिदंबरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 1:12 AM