Lokmat Money > बिझनेस न्यूज > परत आलेल्या नोटांवरून यश मोजणे चूक

परत आलेल्या नोटांवरून यश मोजणे चूक

बँकांमध्ये परत आलेल्या पैशांवरून नोटाबंदीचे यश मोजणे चूक आहे, असे प्रतिपादन उच्चस्तरीय सरकारी अधिकाºयांनी केले आहे. बंद करण्यात आलेल्या नोटांचा ठरावीक हिस्सा बँकिंग व्यवस्थेत परत येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 02:50 AM2017-09-01T02:50:29+5:302017-09-01T02:50:56+5:30

बँकांमध्ये परत आलेल्या पैशांवरून नोटाबंदीचे यश मोजणे चूक आहे, असे प्रतिपादन उच्चस्तरीय सरकारी अधिकाºयांनी केले आहे. बंद करण्यात आलेल्या नोटांचा ठरावीक हिस्सा बँकिंग व्यवस्थेत परत येणार नाही

Success count for returning notes is a mistake | परत आलेल्या नोटांवरून यश मोजणे चूक

परत आलेल्या नोटांवरून यश मोजणे चूक

नवी दिल्ली : बँकांमध्ये परत आलेल्या पैशांवरून नोटाबंदीचे यश मोजणे चूक आहे, असे प्रतिपादन उच्चस्तरीय सरकारी अधिकाºयांनी केले आहे. बंद करण्यात आलेल्या नोटांचा ठरावीक हिस्सा बँकिंग व्यवस्थेत परत येणार नाही, असे सरकारने कधीही म्हटले नव्हते. तसेच नोटाबंदीचे यश हे औपचारिक व्यवहाराचे प्रमाण किती वाढले तसेच बेकायदेशीर व घोटाळ्यांतील किती पैसा उघड झाला यावर मोजायला हवे, असेही या अधिकाºयांनी म्हटले आहे.
अधिकाºयांनी सांगितले की, बंद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजारांच्या नोटांतील ९९ टक्के नोटा बँकांत परत आल्या यावरून असे म्हणता येते की, भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर येत असल्याचा हा पुरावाच आहे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था औपचारिक होण्यात मदत झालीच, पण त्याच वेळी अनेक अनधिकृत व्यवहार शोधणे सरकारला शक्य झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम बँकांत परत आली, याचे खरे तर सरकारला श्रेयच द्यायला हवे. अर्थव्यवस्थेतील रोख रकमेचे विश्लेषण आणि तपास करून तिची वैधता तपासण्याची संधी नोटाबंदीने दिली.
अधिकाºयांनी सांगितले की, बँकांत पैसा भरला म्हणजे तो काळ्याचा पांढरा झाला, असे मानणेच मुळात चूक आहे. ठरावीक रकमेच्या नोटा बँकेत येणारच नाहीत, अशी कोणतीही घोषणा अथवा दावा सरकारने केलेला नव्हता. उलट सर्व नोटा बँकिंग व्यवस्थेत परत याव्यात यासाठीच सरकारने प्रयत्न केले. त्यामुळे एवढ्या संख्येने नोटा बँकांत परत आल्या हे सरकारचे यशच ठरते, अपयश नव्हे. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यात मदत झाली आहे. मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर व्यवहार शोधून काढण्यातही मदत झाली. उघडकीस आलेल्या व्यवहारातील पैसा हा काळा पैसा असू शकतो. यातील जो पैसा बेहिशेबी आहे त्यावर सरकारला दंड आणि कर मिळू शकतो. त्याचबरोबर आजपर्यंत औपचारिक वित्तीय व्यवस्थेपासून दूर राहणारे लोकही या व्यवस्थेशी जोडले जातील, असे अधिकाºयांनी सांगितले.

एका अधिकाºयाने सांगितले की, नोटाबंदीमुळे ५६ लाख नवे करदाते निर्माण झाले आहेत. त्याचा सरकारला फायदाच होईल. नोटाबंदीमुळे ३ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त पैसा प्रथमच अर्थव्यवस्थेत आला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नमूद केले होते, याची आठवणही या अधिकाºयाने करून दिली.

Web Title: Success count for returning notes is a mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार