Join us  

Success Story : वय वर्ष केवळ २२, चार वर्षांत उभी केली ६०० कोटींची कंपनी; आता देतोय चीनला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 2:37 PM

अनेकदा आपण ९ ते ६ च्या ऑफिसच्या कामातून बाहेर पडून आपला व्यवसाय करण्याचा विचार करतो. परंतु काही ना काही कारणानं ते स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाही.

अनेकदा आपण ९ ते ६ च्या ऑफिसच्या कामातून बाहेर पडून आपला व्यवसाय करण्याचा विचार करतो. परंतु काही ना काही कारणानं ते स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाही. परंतु आजकाल असे काही तरूण व्यवसायिक पुढे येत आहेत, जे आपलं स्टार्टअप सुरू करतायत. सागर गुप्ता हा कोणत्याही बड्या व्यावसायिक कुटुंबातून नाही. परंतु यानंतरही त्यानं अतिशय कमी वयात आपला व्यवसाय सुरू केलाय.

एक्का इलेक्ट्रॉनिक्सचा संचालक सागर गुप्ता यानं २२ वर्षी दिल्ली विद्यापीठातून आपलं बी कॉमचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यानं एका वर्षात आपल्या वडिलांसोबत मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस सुरू केला आणि तेव्हापासून मागे वळून पाहिलं नाही. केवळ ४ वर्षात त्यानं ६०० कोटी रूपयांचा व्यवसाय उभा केला.

सुरूवातीच्या काळात त्याची व्यवसायिक बनण्याची कोणतीही योजना नव्हती. त्याला सीए व्हायचं होतं आमि यासाठी त्यानं दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं. परंतु उत्तीर्ण झाल्यानंतर त्यानं मन बदललं आणि मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायात काही करण्याचा निर्णय घेतला. सागरला हीच संधी दिसली आणि त्यानं आपलं काम सुरू केलं. ३० वर्षांपासून त्याचे वडील सेमीकंडक्टरचा व्यवसाय करत होते. २०१७ मध्ये त्यानं एलईडी टीव्हीचं उत्पादन सुरु केलं. दोन वर्षांनंतर वडील आणि मुलानं नोएडात व्यवसाय सुरू केला.  आपल्या वडिलांमुळे सागरलला या व्यवसायाची माहिती होण्यास मदत झाली. तेव्हा एलईडीच्या क्षेत्रात चीनचं वर्चस्व होतं. आता ते भारतात याची व्याप्ती वाढवत आहेत.

१ लाखांपेक्षा अधिक टीव्ही

त्यांची कंपनी आता १ लाखांपेक्षा अधिक टीव्ही तयार करते. २०२२-२३ मध्ये त्यांच्या कंपनीचा महसूल ६०० कोटींवर पोहोचला. सागर गुप्ता आता स्मार्टवॉच, स्पीकर्स आणि वॉशिंग मशीनचंही उत्पादन करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार यासाठी त्याला नोएडामध्ये १ हजार कोटींची गुंतवणूक करायची आहे. त्यांच्याकडे सध्या सेनीपतमध्ये एक फॅक्ट्री असून १ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. ते एलईडी टीव्हीचं उत्पादन तर करतातच याशिवाय ते फ्री टू एअरच्या सेट टॉप बॉक्सचंही उत्पादन करतात.

टॅग्स :व्यवसाय