Join us

एअरपोर्टवर सफाई कर्मचाऱ्याचं काम पाहिलं; अन् आज कोट्यवधीच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 2:21 PM

अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर एका सामान्य कुटुंबातील तरुणाचा प्रेरणादायी प्रवास थक्क करणारा आहे.

Success Story : उत्तर प्रदेशतील अलीगडच्या आमिर कुतुब यांचे अतुलनीय यश प्रत्येकाला प्रेरणा देणारं ठरलं आहे. सफाई कर्मचारी म्हणून केलेलं काम ते कोट्यवधींच्या कंपनीचे मालक, हा खडतर प्रवास त्यांच्या यशाची व्याख्या सांगतो. 

सामान्य कुटुंबात जन्मलेला आमिर यांच्या कंपनीत तब्बल १०० हून अधिक कर्मचारी काम करत असल्याचं सांगण्यात येते. आमिर कुतुब यांनी एकेकाळी एअरपोर्टवर सफाई कर्मचारी म्हणून काम केलं. आज कोट्यवधींचा मालक असलेल्या तरुणाला ३०० पेक्षा जास्त कंपन्याकडून रिजेक्शन मिळालं होतं. पेपरबॉयचे काम असो किंवा सफाई कर्मचारी अमीर यांनी आपल्या कामाची लाज न बाळगता अपार मेहनत केली. आमिर कुतुब यांच्या संघर्षातुन प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखं आहे.

अडचणींचा प्रवास : 

असंख्य अडचणींचा सामना करत आमिर कुतुबन यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. १२ वी पास झाल्यानंतर त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. इंजनियरिंगचं शिक्षण पूर्ण होताचं त्यांनी एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. पण व्यवसाय करण्याचं स्वप्न झोपू देत नव्हतं. आमिर यांनी काही दिवस एका खासगी कंपनीत वेबसाईट डिजायनर म्हणून देखील काम पाहिलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये नोकरी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले पण पदरी निराशा आली. ४ महिन्यांत जवळपास १७० हून अधिक ठिकाणी मुलाखती दिल्या मात्र त्यांची कुठेही निवड झाली नाही

आमिर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे इंग्रजी चांगले नव्हते, आणि कोणत्याही अनुभवाशिवाय नोकरी शोधणे खूप कठीण होते. तीन महिन्यांच्या प्रयत्नानंतर त्यांना  एअरपोर्टवर साफसफाईचे काम मिळाले. या कामासाठी त्यांना २० डॉलर मानधन मिळाले. दिवसभराच्या नोकरीमुळे त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता.

संघर्षातून मिळालं यश :

इंग्रजी भाषेवर प्रभूत्व नसल्याने शिवाय गाठीशी कोणताही अनुभव नव्हता त्यामुळे आमिर यांना नोकरी शोधणे कठीण झाले. मोठ्या प्रतिक्षेनंतर एअरपोर्टवर सफाई कामगाराची नोकरी मिळाली. परंतु एवढ्यात त्याने हार मानली नाही. सकाळी लवकर उठून काही ठिकाणी पेपर टाकण्याचं काम देखील अमिर यांनी केलंय. शेवटी त्यांच्या या प्रयत्नांना साथ मिळाली. एका आयटी कंपनीत इंटर्नशिप करण्याची संधी त्याला  मिळाली. त्या कंपनीत कुतुब यांना अवघ्या १५ दिवसांत ऑपरेशन मॅनेजर म्हणून बढती मिळाली.

 कोट्यवधींचा मालक :

आमिर कुतुब यांची दोन वर्षांनी कंपनीच्या अंतरिम महाव्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली. याच काळात कुतुब एकदा एका व्यावसायिकाला भेटले. यावेळी, त्यांच्या मनात एक अ‍ॅप्लिकेशन तयार करण्याची कल्पना आली ज्यामुळे कंपन्यांना पैसे वाचविण्यास मदत होईल. यानंतर त्यांनी एंटरप्राइज मंकी सुरू करण्याची कल्पना आली. अवघ्या  २ हजार डॉलरमध्ये सुरू केलेल्या कंपनीला आमिर कुतुब यांनी यशाच्य शिखरावर नेलं. जगभरात वेगवेगळ्या देशांत त्यांच्या कंपन्या असून त्यांची उलाढाल १० कोटींच्या आसपास आहे.

टॅग्स :आंतरराष्ट्रीयव्यवसाय