Lokmat Money > बिझनेस न्यूज > 2BHK ते 8 लाख चौ. फूट... 'फ्लिपकार्ट'च्या झंझावाती प्रवासाची गोष्ट

2BHK ते 8 लाख चौ. फूट... 'फ्लिपकार्ट'च्या झंझावाती प्रवासाची गोष्ट

२ बीचएचकेमधील फ्लिपकार्ट ते साडेआठ लाख चौरस फुटांवरील फ्लिपकार्ट या झंझावती प्रगतीचा हा आढावा... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 12:21 PM2018-05-10T12:21:46+5:302018-05-10T12:21:46+5:30

२ बीचएचकेमधील फ्लिपकार्ट ते साडेआठ लाख चौरस फुटांवरील फ्लिपकार्ट या झंझावती प्रगतीचा हा आढावा... 

success story of flipkart, Walmart Inc acquired a 77% stake in this company | 2BHK ते 8 लाख चौ. फूट... 'फ्लिपकार्ट'च्या झंझावाती प्रवासाची गोष्ट

2BHK ते 8 लाख चौ. फूट... 'फ्लिपकार्ट'च्या झंझावाती प्रवासाची गोष्ट

बेंगळुरूः देशातील अव्वल नंबरी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टचे ७७ टक्के समभाग जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्टनं विकत घेतले आहेत. हा व्यवहार ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठं 'डील' ठरला आहे. आयआयटीच्या दोन तरुणांनी टू बीएचके फ्लॅटमधून सुरू केलेली एक कंपनी अवघ्या ११ वर्षांत १६ अब्ज डॉलर्सना (१.१२ लाख कोटी रुपयांना) विकली जाते, हा प्रवास थक्क करणारा आहे. या व्यवहाराच्या निमित्ताने, २ बीचएचकेमधील फ्लिपकार्ट ते साडेआठ लाख चौरस फुटांवरील फ्लिपकार्ट या झंझावती प्रगतीचा हा आढावा... 

* २००७ मध्ये अॅमेझॉनची नोकरी सोडून, सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल या जोडगोळीनं ऑनलाइन बुकस्टोअर म्हणून फ्लिपकार्टची सुरुवात केली. 

* बेंगळुरूमधील २ बीएचके फ्लॅटमध्ये फ्लिपकार्टची सुरुवात झाली होती. २००८ मध्ये दिल्लीत आणि २००९ मध्ये मुंबईत कंपनीचं ऑफिस सुरू झालं. आजघडीला, बेंगळुरूत साडेआठ लाख चौरस फुटांच्या भव्य कॅम्पसमध्ये फ्लिपकार्ट नावाची जणू नगरीच वसली आहे. 

* सुरुवातीला केवळ पुस्तकं विकणाऱ्या फ्लिपकार्टवर आज आपल्याला जे हवं ते मिळू शकतं. 

* परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्याच्या उद्देशाने २०११ मध्ये फ्लिपकार्टनं सिंगापूरकडेही 'टेक ऑफ' केलं होतं.

* मिंत्रा, ईबे, फोनपे, चकपक अशा छोट्या ई-कॉमर्स कंपन्या खरेदी करून फ्लिपकार्टनं आपला पसारा वाढवला, घोडदौड सुरू ठेवली. 

* २०१० मध्ये फ्लिपकार्टने ग्राहकांना 'कॅश ऑन डिलिव्हरी'चा पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उचललेलं हे पाऊल यशस्वी ठरलं आणि आज फ्लिपकार्ट घराघरात आणि मनामनात जाऊन बसलंय. 

* एखादं प्रॉडक्ट आधी 'ऑनलाइन लॉन्च' करण्याची प्रथाही फ्लिपकार्टनं पाडली. २०१४ मध्ये मोटोरोलानं आपले मोबाइल फ्लिपकार्टवरून लॉन्च केले आणि भारतीय बाजारात दमदार पुनरागमन केलं.

* भारतातील इंटरनेटचा वेग पाहून फ्लिपकार्टने २०१५ मध्ये लाइट व्हर्जन लॉन्च केलं. पुढे हा प्रयोग इतर अनेक मोबाइल अॅप्सनी केला. 

* मध्यमवर्गीय मंडळींना डोळ्यापुढे ठेवून, त्यांना महागड्या वस्तू खरेदी करता याव्यात, यादृष्टीने फ्लिपकार्टने नो-कॉस्ट इएमआय सुविधा दिली आणि त्याचा फायदा आज हजारो ग्राहक घेत आहेत. 

* जुन्या वस्तू एक्सचेंज करण्याचा पर्यायही फ्लिपकार्टनं उपलब्ध करून दिला. त्यातही ग्राहकांचा मोठा फायदा झाला आणि फ्लिपकार्टची लोकप्रियता वाढली. 

Web Title: success story of flipkart, Walmart Inc acquired a 77% stake in this company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.