Lokmat Money > बिझनेस न्यूज > 33व्या वर्षी Tata समूहातील कंपनीच्या CEOपदी; कोण आहेत अवनी दावडा? जाणून घ्या...

33व्या वर्षी Tata समूहातील कंपनीच्या CEOपदी; कोण आहेत अवनी दावडा? जाणून घ्या...

Success Story: अवनी यांनी टाटा समूहाचा Starbucks ब्रँड देशभरात लोकप्रिय केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:47 PM2023-07-27T16:47:40+5:302023-07-27T16:48:25+5:30

Success Story: अवनी यांनी टाटा समूहाचा Starbucks ब्रँड देशभरात लोकप्रिय केला.

Success Story: Former Starbucks CEO, Tata group company, Who is Avni Davda? | 33व्या वर्षी Tata समूहातील कंपनीच्या CEOपदी; कोण आहेत अवनी दावडा? जाणून घ्या...

33व्या वर्षी Tata समूहातील कंपनीच्या CEOपदी; कोण आहेत अवनी दावडा? जाणून घ्या...

Success Story: कॉफीच्या शौकीनांनी स्टारबक्सचे (Starbucks) नाव ऐकलेच असेल. मेट्रो शहरांमध्ये स्टारबक्स खूप लोकप्रिय आहे. 33 व्या वर्षी अवनी दावडा  (Starbucks CEO Avani Saglani Davda) यांनी टाटा समूहाच्या या कंपनीला (Tata Starbucks) देशभर ओळख मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. त्या टाटा समूहातील सर्वात तरुण CEO आहेत. अवनी दावडांनी एवढ्या लहान वयात मोठं पद कसं मिळवलं.

अवनी दावडाचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले. तिने प्रतिष्ठित एच.आर. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले. पदवी घेतल्यानंतर अवनीने नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

अवनीने 2002 मध्ये पदवी घेतल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. त्यांनी प्रतिष्ठित टाटा प्रशासकीय सेवा (TAS) मध्ये अर्ज केला. टाटा समूहाच्या विविध कंपन्यांमधील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांनी करिअरची एक एक पायरी चढली. इंडियन हॉटेल्स आणि इन्फिनिटी रिटेल लिमिटेड या टाटा समूहाच्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनी त्यांच्या कामाने व्यवस्थापनाला प्रभावित केले.

आरके कृष्ण कुमार यांचा विश्वास
अवनी दावडाला तिच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी टाटा सन्सचे माजी संचालक आणि रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे आरके कृष्ण कुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. टाटा ग्लोबल बेव्हरेजेस लिमिटेड आणि स्टारबक्स कॉफी कंपनी यांच्यातील संयुक्त उपक्रमाचे नेतृत्व करण्यासाठी आरके कृष्ण कुमार यांनी अवनीची निवड केली. अवनी दावडा यांची टाटा स्टारबक्सच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली, जी टाटा समूहाच्या या ब्रँडसाठी टर्निंग पॉइंट ठरली.

अवनीने ब्रँड लोकप्रिय करण्याबरोबरच आर्थिक स्थिती मजबूत केली. टाटा स्टारबक्सने नुकताच रु. 1000 कोटी कमाईचा टप्पा ओलांडला आहे. टाटा स्टारबक्सच्या CEO म्हणून तिच्या यशस्वी कार्यकाळानंतर अवनी दावडा यांनी गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या गोदरेज नेचर्स बास्केट लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही भूमिका स्वीकारली.

Web Title: Success Story: Former Starbucks CEO, Tata group company, Who is Avni Davda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.