Lokmat Money > बिझनेस न्यूज > Kotak MF's Nilesh Shah : ५० रुपयांचं स्टायपेंड ते १५ कोटींची सॅलरी, आज ही व्यक्ती सांभाळतेय ₹४०००००००००००० चा फंड

Kotak MF's Nilesh Shah : ५० रुपयांचं स्टायपेंड ते १५ कोटींची सॅलरी, आज ही व्यक्ती सांभाळतेय ₹४०००००००००००० चा फंड

Kotak MF's Nilesh Shah : जर तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे मिळतंच. अशाच आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 11:51 AM2024-08-01T11:51:09+5:302024-08-01T11:52:04+5:30

Kotak MF's Nilesh Shah : जर तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे मिळतंच. अशाच आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

Success Story From a stipend of 50 rupees to a salary of 15 crores today this person manages a fund of rs 40000000000 success story of kotak mutual fund nilesh shah | Kotak MF's Nilesh Shah : ५० रुपयांचं स्टायपेंड ते १५ कोटींची सॅलरी, आज ही व्यक्ती सांभाळतेय ₹४०००००००००००० चा फंड

Kotak MF's Nilesh Shah : ५० रुपयांचं स्टायपेंड ते १५ कोटींची सॅलरी, आज ही व्यक्ती सांभाळतेय ₹४०००००००००००० चा फंड

Success Story: जर तुमच्यात जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे मिळतंच. अशाच आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाचं शिखर गाठणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. निलेश शाह हे कोटक म्युच्युअल फंडाचे (Kotak Mutual Fund) एमडी आणि सीईओ आहेत. त्यांची कहाणी प्रेरणा देणारी आहे. एकेकाळी त्यांना फक्त ५० रुपये स्टायपेंड मिळत होतं. पण आज त्यांचा पगार १५ कोटींहून अधिक आहे. मुंबईच्या काळबादेवी चाळीपासून चार लाख कोटी रुपयांचा फंड मॅनेज करण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कौतुकास्पद आहे. शाह हे शिक्षणाला यशाची गुरुकिल्ली मानतात. त्यांच्या मते जीवनातील प्रत्येक आव्हानावर मात करण्याचा हाच मार्ग आहे. निलेश शाह यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊया.

बालपणी संघर्ष

निलेश शाह यांचं बालपण मुंबईतील काळबादेवी येथील चाळीत गेलं. निलेश शाह हे लहान असतानाच गिरणी कामगार असलेल्या वडिलांचं निधन झालं. परिस्थिती कठीण होती, पण त्याच्या आईनंही हार मानली नाही. शिक्षण हाच प्रत्येक समस्येवरचा उपाय आहे, अशी प्रेरणा त्यांनी निलेश यांना नेहमीच दिली. शाळेच्या मुख्याध्यापकांनीही निलेश यांची प्रतिभा ओळखली आणि त्यांची फी माफ करण्यात आली. त्यांना कायमच अव्वल राहावं लागेल, अशी त्यांना अट घालण्यात आली होती. निलेश शाह यांच्या आईनं त्याच्यात मेहनत, प्रामाणिकपणा आणि नम्रता हे गुण रुजवले. २५० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या या कुटुंबाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, पण आईचा पाठिंबा कायम त्यांच्यासोबत राहिला.

सीए बनण्याचा निर्णय

अभ्यासाबरोबरच जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागत असल्यानं निलेश यांनी एमबीएऐवजी सीए करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका फर्ममध्ये आर्टिकलशिप सुरू केली, जिथे सुरुवातीला त्यांना फक्त ५० रुपये स्टायपेंड मिळालं. नंतर त्यांचे गुरू प्रफुल्लभाई यांनी ते वाढवून २५० रुपये केली. या आर्थिक मदतीमुळे निलेश शाह यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता आले आणि सीए फायनलमध्ये ऑल इंडिया रँक वन मिळवला.

"आईनं सतत प्रेरणा दिली"

कुशल लोढा यांच्यासोबतच्या पॉडकास्टमध्ये शाह यांनी काळबादेवीच्या चाळीतील बालपणीचा संघर्ष सांगितला. प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याची प्रेरणा आईने कशी दिली, हेही त्यांनी सांगितलं.

कोट्यवधींचं पॅकेज

निलेश शाह यांनी आपल्या कारकिर्दीत नेहमीच पैशांपेक्षा विश्वासाला महत्त्व दिलं आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास ही सर्वात मोठी संपत्ती आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. फंड मॅनेजमेंटचा हा त्यांचा दृष्टिकोन आहे, जिथे गुंतवणूकदारांच्या हितांचं रक्षण करणं हे त्यांचं पहिलं प्राधान्य आहे. निलेश शाह यांचा वार्षिक पगार आता १५.७८ कोटी रुपये आहे. शिक्षण, चिकाटी आणि नम्रतेच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येतं, हे त्यांच्या या प्रवासातून दिसून येतं.

Web Title: Success Story From a stipend of 50 rupees to a salary of 15 crores today this person manages a fund of rs 40000000000 success story of kotak mutual fund nilesh shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.