Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुगलची नोकरी सोडून 'तो' विकतोय सामोसे; 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक

गुगलची नोकरी सोडून 'तो' विकतोय सामोसे; 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक

आयुष्यात एक चांगली नोकरी असावी, अशी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची धारणा असते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 03:49 PM2019-02-12T15:49:14+5:302019-02-12T15:50:25+5:30

आयुष्यात एक चांगली नोकरी असावी, अशी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची धारणा असते

success story of google employee who now selling samosa become samosa vendor | गुगलची नोकरी सोडून 'तो' विकतोय सामोसे; 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक

गुगलची नोकरी सोडून 'तो' विकतोय सामोसे; 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक

नवी दिल्ली- आयुष्यात एक चांगली नोकरी असावी, अशी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची धारणा असते. एका चांगल्या कंपनीत नोकरी आणि सुखी कुटुंब असं काहीसं एका सामान्य व्यक्तीची इच्छा असते. परंतु एका अवलियानं चक्क गुगलमधल्या नोकरीला राम राम ठोकून समोसे विकण्याचा निर्णय घेतला. आणि समोसे विकता विकता तो व्यक्ती आज 50 लाखांहून अधिकच्या संपत्तीचा मालक आहे. मुनाफ कपाडिया यांनी गुगलची नोकरी सोडून समोसा विकण्याचं ठरवलं. समोसे विकता विकता त्यानं रेस्टॉरंटचा व्यवसाय सुरू आहे. या व्यवसायांतर्गत त्यानं 'द बोहरी किचन' हे हॉटेल उघडलं आणि आत त्यांच्या या हॉटेलच्या व्यवसायाची उलाढाल जवळपास 50 लाखांच्या घरात आहे. मुनाफ कपाडिया यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एका पोस्टमध्ये लिहिलं होतं की, मी एक असा व्यक्ती आहे, ज्याने समोसा विकण्यासाठी गुगलची नोकरी सोडली. मुनाफचे समोसे हे मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. 

मुनाफ यांनी एमबीएची पदवी मिळवली असून, काही कंपन्यांमध्ये सुरुवातीला काम केल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. परदेशात नोकरीच्या शोधात असतानाच त्यांना गुगलमध्ये नोकरी मिळाली. गुगलमध्ये अनेक वर्षं काम केल्यानंतर मुनाफ यांना व्यवसाय करण्याची इच्छा झाली, त्यानुसार त्यांनी गुगलच्या नोकरीला राम राम ठोकला. तसेच राजीनामा दिल्यानंतर ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी समोसे विकण्यास सुरुवात केली. समोसे विकता विकताच त्यांनी दुसऱ्या बाजूनं द बोहरी किचन या हॉटेलची सुरुवात केली. मुनाफचे द बोहरी किचन हे हॉटेल मुंबईत नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे. तसेच मुनाफ तयार करत असलेल्या समोश्याला ट्रेड मार्कही देण्यात आला आहे.

मुनाफ यांच्या हॉटेलमध्ये मटण समोसा, नरगिस कबाब, डब्बा गोश्त आणि कडी भात हे पदार्थ मिळतात. त्यांच्या हॉटेलमध्ये खिमा समोसाही बनवतो, ज्याची मागणी जास्त प्रमाणात आहे. त्यांचं रेस्टॉरंट सुरू वर्षभराचा कालावधी लोटला आहे. या वर्षभरात त्याच्या व्यवसायाची उलाढाल 50 लाखांहून अधिक झाली आहे. मुनाफ हे व्यवसाय 3 ते 5 कोटींपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. गेल्या दोन वर्षांत हॉटेलची उलाढाल 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. द बोहरी किचनचं हे रेस्टॉरंट अनेक सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय आहे.

Web Title: success story of google employee who now selling samosa become samosa vendor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.