गरिबी अनेकांच्या वाट्याला येते, पण या गरिबीतही कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द असेल तर आपण काहीही करु शकतो. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणे आहे, ज्यांची सुरुवात खूप गरिबीतून झाली. पण,ते सध्या श्रीमंत आहेत. अनेकजण त्यांच्या जीवनात यशस्वी झालेत. आज आपण अशाच एका व्यक्तीची यशोगाथ पाहणार आहोत. या व्यक्तीचे सुरुवातीचे आयुष्य मुंबईतील एका झोपडपट्टीत गेले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांना खर्चालाही पैसे मिळत नव्हते, पण त्यांनी जिद्द सोडली नाही. स्वत:चा खर्च भागवण्यासाठी त्यांनी पुस्तके विकली, राख्या विकल्या अन् या माध्यामातून त्यांनी आपला खर्च भागवला. लहानपणीच्या कष्टाच्या दिवसाची त्यांना जाणीव होती, यामुळेच ते आज यशाच्या शिखरावर आहेत. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून 'डेन्यूब' समुहाचे रिझवान साजन आहेत.
रिझवान साजन यांनी त्यांचे लहानपण मुंबईतील एका झोपडपट्टीत घालवले आहे, पण ते आज दुबईमध्ये लोकांना घरे विकतात. दुबईमध्ये आज त्यांचे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. अनेकांना दुबईला फिरायला जाणे होत नाही. पण त्यांनी कुवेत , दुबई सारख्या देशात नोकरी करुन आपला स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. फक्त सुरूच नाहीतर त्यांनी त्या व्यवसायत मोठे यशही मिळवले आहे.
बँक लॉकर घेताय? आधी रिझर्व्ह बँकेचे नियम वाचा; RBI'ने नवीन अपडेट दिली
रिझवान साजन यांचे सुरुवातीचे आयुष्य खडतर गेले आहे. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा ते १६ वर्षाचे होते. यानंतर त्यांनी त्यांचे शिक्षण मध्येच सोडले, यावेळी त्यांनी मुंबईतच दोन वर्षे छोटी मोठी कामे केलीत. वडिलांच्या मृत्यूनंतर सुमारे दोन वर्षांनी, त्यांच्या काकांनी त्यांना कुवेतमध्ये नोकरीची ऑफर दिली. मुंबईत असताना ते महिन्याला ६ हजार रुपये कमवत होते, तर कुवेतमध्ये त्यांचा पगार १८ हजार रुपये होता. त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणजे ही कुवेतमधील नोकरीच आहे.
स्वत:च व्यवसाय सुरू केला
कुवेतला जाणे म्हणजे त्यांच्यासाठी एक लॉटरीच होती, त्यांनी कुवेतमध्ये कामाला सुरुवात केली. कुवेतमध्ये त्यांनी आधी प्रशिक्षणार्थी सेल्समनची नोकरी करण्यास सुरुवात केली. हळूहळू पद आणि पगार दोन्ही वाढत गेले. १९९३ मध्ये त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी त्यांच्या व्यवसायात मोठी प्रगती केली.
फोर्ब्सनुसार, रिझवान यांनी २०१४ मध्ये मध्य पूर्वेतील रिअल इस्टेटच्या जगात प्रवेश केला. युएईमध्ये आतापर्यंत २५ हून अधिक निवासी प्रकल्प सुरू केले आहेत. यामध्ये आणखी लक्झरी प्रकल्प आहेत. दुबईमध्ये भारतीय ज्या मालमत्ता खरेदी करत आहेत, त्यात रिझवान यांच्याशी संबंधित प्रकल्पांची संख्या लक्षणीय आहे. दरमहा एक टक्के पेमेंट प्लॅनसह लक्झरी परवडणारी योजना लॉन्च करण्याची रिझवान यांची योजना आहे.