Join us  

कौतुकास्पद! वडिलांच्या छोट्या लॅबला बनवली ९ हजार कोटींची संपत्ती, कोण आहे अमीरा शाह?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 5:03 PM

एका छोट्या खोलीत चालणारी पॅथोलॉजी लॅब आज ७ देशात पोहोचली आहे. एका मुलीने आपल्या वडिलांचा लॅबचा व्यवसाय आज ७ देशात पोहोचवला आहे.

एका छोट्या खोलीत चालणारी पॅथोलॉजी लॅब आज ७ देशात पोहोचली आहे. एका मुलीने आपल्या वडिलांचा लॅबचा व्यवसाय आज ७ देशात पोहोचवला आहे. ७ देशात आज १७१ लॅब काम करत आहेत. वडिलांचा व्यवसाय साता समुद्रापार पोहोचवणारी मुलगी म्हणजे अमीरा शाह. मेट्रोपोलिस या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबची पायाभरणी करणार्‍या अमीरा शाह यांचे व्यावसायिक यश अद्वितीय आहे. 

अमेरिकेच्या टेक्सास विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या अमीराचे आई, वडिल दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचे वडिल डॉ. सुशील शाह , हे 'डॉ. सुशील शाह लॅबोरेटरी' नावाने लॅबोरेटरी चालवत होते. 

Extra Income Formula : महिन्याला वेतनाइतकी रक्कम मिळवा, पगाराला हात लावायची गरज नाही; करा 'हा' उपाय...

बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्यामुळे प्रभावित झालेल्या अमीराने 2001 मध्ये अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर तिच्या वडिलांची लॅब सांभाळण्याचा निर्णय घेतला. देशभरात पॅथॉलॉजी लॅबची साखळी निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश होता. आज त्यांना यश आले आहे. आज मेट्रोपोलिस ही एक मोठी कंपनी असून ती कंपनी लिस्टेड आहे, ज्याचे मूल्यांकन सुमारे 1.12 डॉलर अब्ज म्हणजेच सुमारे 9,000 कोटी रुपये आहे. मेट्रोपोलिस 2019 मध्ये शेअर बाजारात लिस्टेड झाले.

ग्राहकांचा विश्वासही वाढला

'लॅबच्या ग्राहकांचा विश्वास संपादन करणे हे एक आव्हानात्मक काम होते. म्हणूनच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील सहानुभूती, सचोटी आणि अचूकता यावर लक्ष केंद्रित केले आहे. सुरुवातीला आमच्याकडे एक मजबूत वैद्यकीय संघ टीम होती, पण विक्री, आणि खरेदी टीम कमकुवत होती. आम्ही ही कमतरता दूर केली. आमच्याशी संबंधित लोक वैद्यकीय पार्श्वभूमीचे होते आणि ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कमी विचार करत होते. हळूहळू त्यांना व्यवसायाच्या दृष्टीनेही विचार करण्याची आणि योजना करण्याची प्रेरणा मिळाली. यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ तर झालीच, शिवाय ग्राहकांचा विश्वासही वाढला, अशी माहिती अमीराने दिली.  

अमीराने तिच्या वडिलांसोबत अडीच कोटी रुपयांत मेट्रोपोलिस सुरू केले. सुरुवातीचा नफा महानगराच्या विस्तारात पुन्हा गुंतवला असता. मी आणि वडील डॉ. सुशील शाह कंपनीकडून फक्त पगार घेत होतो. बाकी काही घेतलेले नाही. 2021 पर्यंत मेट्रोपोलिसला मिळालेला नफा इतर कामांसाठी कधीही वापरला नाही. सुरुवातीला अमीराचा पगार तिच्याच कंपनीत महिन्याला 15,000 रुपये होता, असं अमीरा म्हणाली. 

 'तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही इतरांकडून घेतलेला पैसा ही तुमची मालमत्ता नसून ती तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्हाला ते चांगल्या रिटर्नसह परत करावे लागेल. जर तुम्ही ही जबाबदारी चोखपणे पार पाडली तर गुंतवणूकदारांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो, असंही अमीरा म्हणाली. व्यवसाय वाढवण्यासाठी मी 2005 मध्ये फंड घेतला आणि 2015 मध्ये 600 कोटी कर्ज घेतल्याचे अमीराने सांगितले. 

टॅग्स :व्यवसाय