Success Story: सोशल मीडिया हे आता फक्त मनोरंजनाचं माध्यम राहिलं नाही. यातून लोक कोट्यवधी रुपये रोज कमावत आहेत. जर तुम्ही युट्यूब पाहात असाल तर निशा मधुलिका यांचा एखादा तरी व्हिडीओ तुमच्या डोळ्याखालून नक्कीच गेला असेल. निशा मधुलिका ह्या सोप्या पद्धतीने वेगवेगळी पक्वाने बनवण्यात तरबेज आहेत. घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करत स्वादिष्ट जेवण बनवण्याची कला क्वचितच एखादा यूट्यूबर शिकवत असेल. सध्याच्या घडीला कुकींग शिकवणारे हजारो यूट्यूब चॅनेल आहेत. त्यांचा मोठा सबस्क्रायबर वर्गही असेल. मात्र, एक काळ असा होता की या क्षेत्रात फक्त निशा मधुलिका यांचं नाव घेतलं जात होतं. ज्या वयात लोकं निवृत्ती घेण्याचा विचार करतात, त्या वयात निशा यांनी नव्या क्षेत्रात मोठ्ठ नाव कमावण्याची किमया साधली. पण, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
निशा मधुलिका यांनी वयाच्या ५४व्या वर्षी एका नव्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला. आणि यूट्यूबच्या जगात मोठं नाव कमावलं. ही स्टोरी केवळ YouTuber बनण्याची नाही तर या वयातही यश मिळवण्यासाठी स्वावलंबन आणि प्रेरणा देणारी आहे. निशा मधुलिका यांनी 43 कोटी रुपयांची कमाई कशी केली?
निशा मधुलिका या मूळच्या उत्तर प्रदेशमधील आहेत. तिथेच त्यांचं पालनपोषण आणि शिक्षण झालं. विज्ञान विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच त्यांना चांगले जेवण बनवण्याची आवड होती. लग्नानंतर त्या दिल्लीत स्थायिक झाल्या, पण पतीच्या व्यवसायात आल्यानंतरही त्यांची स्वयंपाकाची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती. या छंदानेच त्यांना यूट्यूबच्या जगात आणले.
२०११ मध्ये यूट्यूबवर सुरुवात
निशा मधुलिका यांनी 2007 मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली, स्वतःची वेबसाइट काढली. 2011 मध्ये त्यांनी यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा 1 GB डेटा विकत घेण्यासाठी जवळपास 300 रुपये खर्च येत होता. इंटरनेट आजच्या इतके सामान्य नव्हते. बहुतेक लोक कॅफे किंवा ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट एक्सेस करत होते. अशा स्थितीत हळूहळू त्यांचे व्हिडीओ लोकप्रिय होऊ लागले. आज त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर 14.4 मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. त्यांच्या अधिकृत चॅनेलवर २२०० व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत.
निशा मधुलिका यांचे यूट्यूब चॅनल केवळ कुकिंग व्हिडिओंपुरते मर्यादित नाही. त्यांनी ऑनलाइन साम्राज्य उभारलं आहे. 5 जणांची प्रोफेशनल टीम हे सर्व मॅनेज करते. त्यांच्या यशामागे या टीमचाही मोठा हातभार आहे. जे त्यांचे व्हिडिओ बनवण्यापासून ते एडिटिंग आणि प्रमोशनपर्यंतचे काम पाहते.
काही रिपोर्ट्सनुसार, निशा मधुलिका यांची अंदाजे एकूण संपत्ती 43 कोटी रुपये आहे. हा अधिकृत आकडा नसला तरी. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये हे कलेक्ट करण्यात आले आहे. YouTube जाहिराती, स्पॉन्सर्ड कंटेंट आणि ब्रँड डील हे त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. त्या केवळ यूट्यूबवरच नाही तर इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही सक्रिय आहे. निशा यांचे कुटुंब त्यांचे प्रेरणास्त्रोत आहे.