Join us

'आयडीयाची कल्पना' ऑनलाईन शैक्षणिक अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई; प्रेरणा झुनझुनवालांची यशोगाथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 4:05 PM

व्यवसाय करताना मेहनतीला कल्पकतेची जोड मिळाली तर यश तुमचं असतं. अपयश आलं तर खचुन नं जाता संधीतून संधी निर्माण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात असले पाहीजे. असा आदर्श लिटील पेंडीगनच्या संस्थापक प्रेरणा झुनझुनवाला यांनी तरुणांपढे ठेवला आहे.

Success Story : आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. एका शैक्षणिक अ‍ॅपच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या प्रेरणा झुनझुनवाला यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सिंगापूर येथे स्थित असलेल लिटील पेंडिंगटन ही शाळा त्या चालवतात. 

हल्ली मार्केटमध्ये शिकवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. शाळा, कॉलेजेस या व्यतिरिक्त ऑनलाईन लर्निंगकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल आहे. याच संधीचं सोनं करत प्रेरणा यांनी क्रिएटिव्ह गॅलिलिओ या अ‍ॅपची निर्मिती केल्याचे सांगण्यात येते. साधरणत ३ ते  ८ वर्षांच्या मुलांना या अ‍ॅपच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. आतापर्यंत तब्बल ९० लाख यूजर्सनी हे अ‍ॅप डाउनलोड केल्याची माहिती समोर आली आहे.

३३० कोटींचा स्टार्टअप :

सध्या त्यांच्या स्टार्टअपमध्ये ३० लोक काम करतात . शिवाय पुढील वर्षभरात कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करण्याची कंपनीची योजना आहे. प्रियांका झुनझुनवाला यांच्या म्हणण्यानुसार इंडोनेशिया आणि व्हिएतनाममध्येही नवी कंपनी लॉन्च करण्याची त्यांची योजना आहे. अलीकडेच सिंगापूरच्या सात शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. 

इतर अ‍ॅप्सची निर्मिती ::

प्रेरणा यांच्या कंपनीने आणखी २ अ‍ॅप्सही विकसित केले आहेत. 'ToonDemi' आणि 'Little Singham' अशी या अ‍ॅप्सची नावे आहेत.  'Play Store' वर भारतातील मुलांसाठी सर्वाधिक वापरले जाणारे हे एकमेव शैक्षणिक अ‍ॅप आहे, जे टॉप-२० अ‍ॅप्सच्या यादीमध्ये येते.

टॅग्स :व्यवसाय