Join us  

सिक्युरिटी गार्डच्या लेकाची कमाल; व्यवसायात झेप घेत बनला तीन कंपन्यांचा मालक 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 1:49 PM

डोंबिवलीतील एका चाळीत राहणाऱ्या या व्यवसायिकाने अनेकांपुढे आदर्श ठेवला आहे. 

Success Story : मनामध्ये जिद्द आणि त्याला प्रामाणिक कष्टांची जोड असेल तर खडतर परिस्थितीवर सहज मात करता येते. सुशील सिंह यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. 

एसआरएस टेकविजन, डीबाको आणि साइवा सिस्टीम यांसारख्या बड्या कंपन्यामध्ये सुशील सिंह मालक आहेत. एका खासगी कंपनीत कंत्राटी तत्त्वावर सेल्स एक्ज्यूक्युटीव्हचे काम करणाऱ्या तरुणाची यशोगाथा प्रत्येकाला प्रेरणा देणारी ठरेल. महिन्याला ११ हजार रुपये कमवून आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करणाऱ्या तरुणाच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. पण परिस्थितीसमोर न झुकता सुशील यांनी यशाला गवसणी घातली.  

तीन कंपन्यांचा मालक... 

आजच्या घडीला एसआरएस टेकविजन, डीबाको आणि साइवा सिस्टीम या कंपन्यांसह सुशील कुमार हे एका एनजीओचे फाउंडर आहेत. सुशील सिंह यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. वडील सिक्युरिटी गार्डची नोकरी करत असल्याने त्यांना एक वेळचे जेवण मिळणे अवघड होते. शैक्षणिक साहित्याचा अभाव असल्याने  सुशील सिंह बारावीत नापास झाले. आर्थिक अडचणींमुळे सुशील यांना एखादा व्यवसाय करणे देखील अशक्य होते. पण अपार मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सुशील सिंह आज तीन कंपन्यांचे साम्राज्य उभे केले आहे. एक यशस्वी उद्योगपती अशी त्यांची देशभर ख्याती आहे. 

संघर्षातून मार्ग काढला :

पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशाने खचून न जाता सुशील कुमार यांनी १२ वीची पुन्हा फेरपरिक्षा दिली. अलाहाबाद युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्यूटर सायन्समध्ये  शिक्षण  घेत असताना काहीतरी करून दाखवण्याची जि्द्द त्यांना काही झोपू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले. नंतर त्यांनी पॉलिटेक्निकचा कोर्स केला आणि काही काळ सेल्स एक्झिक्युटीव्ह म्हणून काम पाहिले. 

अमेरिकेमध्ये व्यवसायाचा श्रीगणेशा केला :

एका सॉफ्टवेअर  इंजिनिअर असलेल्या तरुणीशी लग्नबंधनात अडकल्यानंतर यादोघांनी नोएडामध्ये अमेरिका येथे स्थित एका व्यवसायाच्या सहकार्याने बीपीओ सुरू केला. त्यानंतर अमेरिकेतूनच त्यांनी ' SSR Techvision' ची स्थापना केली. अमेरिकेतील एका व्यवसायात अवघे तीन ते चार महिने काम केल्यानंतर त्यांना नोएडामध्ये त्यांच्या नवीन व्यवसायासाठी जागा मिळाली.

सध्या तीन नावलौकिक असलेल्या बड्या कंपन्यांचे सुशील कुमार मालक बनले आहेत. सुशील यांनी आपल्या सिक्युरिटी गार्डची नोकरी करणारे वडील तसेच घरकाम करणाऱ्या आईच्या कष्टाचे चीज केले.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी