जर तुम्ही बंगळुरूला गेलात आणि रामेश्वरम कॅफेमध्ये इडली-डोसा किंवा फिल्टर कॉफी प्यायला नाहीत तर तुमची ट्रिप पूर्ण होणार नाही. इथली फिल्टर कॉफी आणि इडली-सांबार खूप प्रसिद्ध आहेत. या कॅफेच्या लोकप्रियतेचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, वादळ असो वा पाऊस, येथे या पदार्थांची चव चाखण्यासाठी अनेक किलोमीटरची लांबलचक रांग दिसते. कॅफेच्या बाहेर लोकांची गर्दी इतकी असते की लोक जमिनीवर बसून खाताना दिसतील. अस्सल दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ खाण्यासाठी लोक लांबून येतात. डोसा, इडली, उत्तपम या दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची आवड असलेले लोक रामेश्वरम कॅफेकडे आपणहूनच आकर्षित होतात. इथले पदार्ख स्वादिष्ट आहेत, तितकाच हा कॅफेही जबरदस्त आहे.
कोट्यवधींत कमाई
अल्ट्रान व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडनं बेंगळुरूमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेची पायाभरणी केली. इंदिरा नगर, बेंगळुरू येथे असलेल्या 10×10 चौरस फुटांच्या दुकानाबाहेर लोकांची मोठी गर्दी दिसते. गर्दी पाहून तुम्ही कमाईचा अंदाज लावू शकता. दर महिन्याला या कॅफेची कमाई 5 कोटी आहे. एका वर्षात हा कॅफे 50 कोटींहून अधिक व्यवसाय करतो.
दररोज ७५०० ऑर्डर्स
B2B मार्केटप्लेस उडानचे सह-संस्थापक सुजित कुमार यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये रामेश्वरम कॅफेबद्दल सांगितलं. त्यांनी कॅफेच्या यशामागचं कारण सांगितलं. या कॅफेचा आकार 10×10 किंवा 10×15 स्क्वेअर फूट आहे. दररोज हा कॅफे 7500 ऑर्डर पुरवतो. या कॅफेला फॅसिलिटी क्विक सर्व्हिस रेस्टोरंट (QSR) म्हणून ओळखलं जातं. याची पोकळी रामेश्वरम कॅफेनं स्थानिक बाजारपेठेत भरून काढली आहे. कॅफे उघडण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण सर्वेक्षण केलं. दक्षिण भारतीय जागेत क्युएसआर ब्रँड नसलेली ठिकाणांची ओळख पटवली. सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी तीन रेस्टॉरंट सुरू केली आणि आज त्यांची कमाई कोट्यवधींमध्ये आहे.
कोण आहेत मालक?
राघवेंद्र राव यांनी रामेश्वरम कॅफेची सुरूवात आपली पत्नी दिव्या राघवेंद्र राव यांच्यासोबत मिळून केली. त्यांच्याकडे फूड इंडस्ट्रीतील 20 वर्षांचा अनुभव आहे. दिव्या या कंपनीच्या सहसंस्थापक असून त्यांनी आयआयएममधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.