वणिज्य बातमी ... १० बाय ३ ...- डॉ. बैनाडे यांची माहिती : नुजीविडू सीडस्चे बियाणे बाजारातनागपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पावसाकडे लागले आहे. पावसाअभावी सर्वच पिकांसोबत कपाशीची पेरणीदेखील लांबणीवर पडली आहे. या नगदी पिकाशिवाय शेतकऱ्यांना पैसे मिळणे अवघड असल्यामुळे हे पीक सोडणे त्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत योग्य नियोजन करून नवीन तंत्रज्ञानाने अर्थात सघन लागवड पद्धतीने कपाशीची लागवड जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते, असे प्रतिपादन नुजीविडू सीडस्चे डॉ. एस.एस. बैनाडे यांनी केले. गेल्या दहा वर्षात पडलेला पाऊस आणि आणि कपाशी लागवड कालावधीचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की, कपाशी पिकविणाऱ्या बऱ्याचशा भागात बहुतांश वेळी कपाशीची लागवड जूनअखेर ते २० जुलैदरम्यान झालेली आहे. क्वचितच १५ जूनपूर्वीच्या लागवडीने वेळ साधली आहे. कपाशीमध्ये बीटी तंत्रज्ञान नसतानाही १५ जुलैपूर्वी लागवड झालेल्या कपाशीपासून भरघोस उत्पादन मिळविणारे बरेच शेतकरी आहेत. खरीप २००८ च्या हंगामात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड होऊनही चांगले उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या उल्लेखनीय आहे. यावरून असा निष्कर्ष निघतो की, अद्याप कपाशी लागवडीची वेळ गेलेली नाही. ३१ जुलैपर्यंतदेखील कपाशीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते. जुलै महिन्यात पेरणी साधण्यासाठी आणि सघन लागवडीसाठी नुजीविडू सीडस्चे मालिनी, भक्ती, बलवान आणि सोना या वाणाचे परिणाम अतिशय चांगले असून, विविध हवामानात येण्याची क्षमता असल्यामुळे हमखास उत्पादनाची हमी मिळते. बैनाडे यांनी यांनी सघन लागवड अवलंब करण्याच्या पद्धतीवर जोर दिला. एकरी १४ हजारापेक्षा जास्त झाडसंख्या ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विषम अंतर ठेवणे, वाढ नियंत्रण आणि खताचा आवश्यक वापर करण्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर किडी-कीटकांचा बंदोबस्त करून अशा तऱ्हेने पिकाचे व्यवस्थापन करून जुलै महिन्याच्या शेवटपर्यंतही लागवड केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळू शकते. नुजीविडू सीडस्चे कपाशी बियाणे बाजारात उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन डॉ. बैनाडे यांनी केले.
जुलैपर्यंत कपाशीची यशस्वी लागवड
वाणिज्य बातमी ... १० बाय ३ ...
By admin | Published: July 1, 2014 11:55 PM2014-07-01T23:55:50+5:302014-07-01T23:55:50+5:30