Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयसीएआय नवी मुंबईतर्फे 'आयसीएआय एमएसएमई सहयोग आणि स्टार्टअप संवाद'चं यशस्वी आयोजन

आयसीएआय नवी मुंबईतर्फे 'आयसीएआय एमएसएमई सहयोग आणि स्टार्टअप संवाद'चं यशस्वी आयोजन

'आयसीएआय सहयोग आणि स्टार्टअप संवाद' हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम नुकताच पार पडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 11:43 AM2023-12-26T11:43:10+5:302023-12-26T11:44:08+5:30

'आयसीएआय सहयोग आणि स्टार्टअप संवाद' हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम नुकताच पार पडला.

Successful organization of ICAI MSME Sahyog and Startup Samvad Program by ICAI Navi Mumbai | आयसीएआय नवी मुंबईतर्फे 'आयसीएआय एमएसएमई सहयोग आणि स्टार्टअप संवाद'चं यशस्वी आयोजन

आयसीएआय नवी मुंबईतर्फे 'आयसीएआय एमएसएमई सहयोग आणि स्टार्टअप संवाद'चं यशस्वी आयोजन

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (ICAI), नवी मुंबई शाखेनं एनएमएसए वाशी येथे 'आयसीएआय सहयोग आणि स्टार्टअप संवाद' या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आयसीएआयच्या एमएसएमई आणि स्टार्टअपच्या समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात चार्टर्ड अकाउंटंट, उद्योग तज्ज्ञ आणि विविध व्यापार संघटनांचे सदस्यांनी सहभाग घेतला होता.

बीएसई एसएमई आणि स्टार्टअपचे प्रमुख अजय ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान, त्यांनी सर्वांना मोलाचं मार्गदर्शनही केलं. दरम्यान, पहिलं सत्र 'एसएमई फायनान्सिंगमधील नवे ट्रेंड्स' या विषयावर केंद्रीत होतं. यामध्ये उद्योग क्षेत्रातील अनेक व्यक्तींसह पॅनल चर्चेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आयसीएआय नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष सीए हर्षल अजमेरा यांनी दिली. 

अर्थ वृत्त कॅपिटलचे संस्थापक सीए सुनील पांडे, ध्रुव कन्सल्टन्सीचे अध्यक्ष पी बी दंडवते, रुपीबॉसचे सीईओ पी एन शेट्टी, व्हीपी हेम सिक्युरिटीज अभिषेक यादव, सीए डॉ. पिंकी अग्रवाल (मॉडरेटर) यांचा या पॅनलमध्ये समावेश होता. एसएमई फायनान्सिंग, एसएमई लिस्टिंग अँड डेट फायनान्सिंगसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा या चर्चेत समावेश करण्यात आला होता. 

दुसऱ्या सत्रात आयसीओएन व्हॅल्युएशनचे पार्टनर सीए आरव्ही देवराजन कृष्णन यांनी 'व्हॅल्युएशन ऑफ स्टार्टअप्स'वर मार्गदर्शन केलं. यामध्ये ब्रान्च नॉमिनी सीए संजय निकम, व्हाईस चेअरमन सीए नीलेश बजाज, मॅनेजिंग कमिटी मेंबर सीए सीव्ही जोमोन, विकासा चेअरमन सीए अमित सोमानी आणि सीए श्रीकुमार नायर, सीए समीर गवळी, सीए मनोज पांडे आणि सीए जयवंत तांडेल यांच्यासह २०० पेक्षा अधिक जणांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Successful organization of ICAI MSME Sahyog and Startup Samvad Program by ICAI Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.