Lokmat Money > बिझनेस न्यूज > १० भागांत स्प्लिट होणार 'हा' शेअर, ९० दिवसांत केलेले पैसे दुप्पट; आता कंपनीनं बदलली रेकॉर्ड डेट

१० भागांत स्प्लिट होणार 'हा' शेअर, ९० दिवसांत केलेले पैसे दुप्पट; आता कंपनीनं बदलली रेकॉर्ड डेट

Stock Split 2024: सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स (Sudarshan Pharma Industries Ltd) आता स्प्लिट होणार आहेत. परंतु कंपनीनं आता ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:58 PM2024-11-09T14:58:00+5:302024-11-09T14:58:00+5:30

Stock Split 2024: सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स (Sudarshan Pharma Industries Ltd) आता स्प्लिट होणार आहेत. परंतु कंपनीनं आता ...

Sudarshan Pharma Industries Ltd share to be split into 10 parts double the money made in 90 days; Now the company has changed the record date | १० भागांत स्प्लिट होणार 'हा' शेअर, ९० दिवसांत केलेले पैसे दुप्पट; आता कंपनीनं बदलली रेकॉर्ड डेट

१० भागांत स्प्लिट होणार 'हा' शेअर, ९० दिवसांत केलेले पैसे दुप्पट; आता कंपनीनं बदलली रेकॉर्ड डेट

Stock Split 2024: सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स (Sudarshan Pharma Industries Ltd) आता स्प्लिट होणार आहेत. परंतु कंपनीनं आता रेकॉर्ड डेट मध्ये बदल केलाय. शुक्रवारी कंपनीचे शेअर्स ४०५ रुपयांच्या पातळीवर बंद झाले.

केव्हा आहे रेकॉर्ड डेट?

सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचा एक शेअर १० भागांमध्ये स्प्लिट होणार आहे. कंपनीनं शेअर बाजारांना दिलेल्या माहितीनुसार १० रुपये फेस व्हॅल्यू असलेला शेअर १० भागांमध्ये स्प्लिट होणार आहे. या शेअर स्प्लिटनंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपयापर्यंत खाली येईल. शेअर स्प्लिटची रेकॉर्ड डेट २३ नोव्हेंबर २०२४ आहे, असं कंपनीनं शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलंय. यापूर्वी स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट १८ नोव्हेंबर २०२४ होती.

शेअरची कामगिरी कशी?

गेल्या आठवडाभरात शेअरचा भाव २.४७ टक्क्यांनी वधारला होता. तर या शेअरच्या किंमतीत ३ महिन्यांत १२६ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. तर सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स ६ महिन्यांपासून होल्ड केलेल्या गुंतवणूकदारांच्या शेअरच्या मूल्यात आतापर्यंत ४६९ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ४५२.७० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५८.२० रुपये आहे. सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज लिमिटेडचं मार्केट कॅप ९७४.६७ कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sudarshan Pharma Industries Ltd share to be split into 10 parts double the money made in 90 days; Now the company has changed the record date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.