Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेव्हा इमिग्रेशन फॉर्ममध्ये टाकला होता ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पत्ता, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

जेव्हा इमिग्रेशन फॉर्ममध्ये टाकला होता ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पत्ता, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झालाय.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 02:23 PM2023-05-16T14:23:13+5:302023-05-16T14:24:07+5:30

भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा विवाह नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी झालाय.

Sudha Murthy narrates story when UK PM rishi sunak address entered in immigration form kapil sharma show akshata murthy | जेव्हा इमिग्रेशन फॉर्ममध्ये टाकला होता ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पत्ता, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

जेव्हा इमिग्रेशन फॉर्ममध्ये टाकला होता ब्रिटनच्या पंतप्रधानांचा पत्ता, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी ब्रिटनमध्ये घडलेला एक किस्सा नुकताच सांगितला. याची सोशल मीडियावर सध्या चर्चाही होतेय. काही दिवसांपूर्वी त्या आपली मुलगी आणि जावई यांना भेटण्यासाठी ब्रिटनला गेल्या होत्या. तेव्हा एअरपोर्टवर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्यांचा राहण्याचा पत्ता १० डाऊनिंग स्ट्रीट आहे हे मान्य करण्यास तयारच नव्हते. १० डाऊनिंग स्ट्रीट हा ऋषि सुनक यांचे निवासस्थान आणि कार्यलयाचा पत्ता आहे. सुधा मूर्ती यांनी इमिग्रेशन फॉर्ममध्ये याचा उल्लेख केला होता.

‘ते’ पोस्टकार्ड आणि जेआरडी टाटांनी बदलली पॉलिसी, सुधा मूर्तींनी सांगितला 'तो' किस्सा

ऋषि सुनक हे सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. नुकत्याच सुधा मूर्ती या कपिल शर्मा शो मध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांनी अनेक किस्से सांगितले. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या मुलीची भेट घेण्यासाठी ब्रिटनला गेल्या होत्या. एअरपोर्टवर उतरल्यानंतर इमिग्रेशन ऑफिसरनं त्यांच्याकडे त्यांना ज्या ठिकाणी राहणार आहेत तो पत्ता विचारला. यादरम्यान त्यांच्यासोबत त्यांची मोठी बहिणही होती. दोघांनाही त्या ठिकाणी १० डाऊनिंग स्ट्रीट लिहावं असं वाटलं. सुधा मूर्ती यांचा मुलगादेखील ब्रिटनमध्येच राहतो. परंतु त्यांना त्याचा संपूर्ण पत्ता माहित नव्हता. म्हणून त्यांनी १० डाऊनिंग स्ट्रीट असा पत्ता लिहिला.

काय होता किस्सा?

त्यावेळी इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पाहून तुम्ही मजा करताय का? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी त्यांनी आपण खरं लिहिल्याचं त्यांना सांगितलं. यानंतर इमिग्रेशन ऑफिसरही अवाक् झाले. त्यांच्यासमोर साडीमध्ये उभ्या असलेल्या महिला आणखी कोणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांच्या सासू आहेत यावर त्यांना विश्वास बसणंच कठीण झालेलं, असा किस्सा सुधा मूर्तींनी कार्यक्रमादरम्यान सांगितला होता. लोकांच्या रंग रुपावरून त्यांच्याबद्दल मनात काही धारणा तयार करणं सोपं आहे, परंतु त्या धारणा चुकीच्या ठरू शकतात, असंही त्यांनी सांगितलं. नुकतंच सुधा मूर्ती यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

Web Title: Sudha Murthy narrates story when UK PM rishi sunak address entered in immigration form kapil sharma show akshata murthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.