Lokmat Money > बिझनेस न्यूज > राज्यात यंदा साखर निर्मितीचा उच्चांक, यंदा कारखान्यांकडून विक्रमी उत्पादन

राज्यात यंदा साखर निर्मितीचा उच्चांक, यंदा कारखान्यांकडून विक्रमी उत्पादन

Sugar : लातूरमधील ५, अहमदनगरमधील ४ तसेच जालना, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणचे प्रत्येकी १ याप्रमाणे १२ ते १३ कारखाने अद्याप सुरू आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:53 PM2022-06-09T12:53:03+5:302022-06-09T12:53:17+5:30

Sugar : लातूरमधील ५, अहमदनगरमधील ४ तसेच जालना, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणचे प्रत्येकी १ याप्रमाणे १२ ते १३ कारखाने अद्याप सुरू आहेत.

Sugar production peaks in the state this year, record production from factories this year | राज्यात यंदा साखर निर्मितीचा उच्चांक, यंदा कारखान्यांकडून विक्रमी उत्पादन

राज्यात यंदा साखर निर्मितीचा उच्चांक, यंदा कारखान्यांकडून विक्रमी उत्पादन

पुणे : राज्यातील १९० साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात १३७ लाख टन साखर उत्पादन करण्याची विक्रमी कामगिरी केली. अद्याप ९ कारखाने सुरू असून, येत्या ३ ते ४ दिवसांत शिल्लक ९३ हजार टन उसाचे गाळप होईल. १५ जूनला शेवटचा कारखाना बंद होईल.
लातूरमधील ५, अहमदनगरमधील ४ तसेच जालना, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणचे प्रत्येकी १ याप्रमाणे १२ ते १३ कारखाने अद्याप सुरू आहेत. उसाची मोळी टाकणे बंद झाले तरीही एक दिवस कारखाना सुरू ठेवावा लागतो. त्याप्रमाणे काही कारखाने सुरू आहेत. प्रत्यक्षात फक्त ९३ हजार टन ऊस शिल्लक असून, ९ कारखान्यांकडून येत्या ३ दिवसांत त्याचेही गाळप होईल, अशी माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले की, यंदा कारखान्यांकडून विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. मात्र, तरीही निर्यात, इथेनॉल निर्मिती यामुळे कारखान्यांना पैसे मिळत गेले, ते त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी (उसाची रास्त किफायतशीर किंमत) देण्यासाठी वापरले. त्यामुळेच ९६ टक्के एफआरपी नियमानुसार अदा केली आहे. एकाही कारखान्यांवर नोटीस बजावण्याची वेळ आयुक्त कार्यालयावर आली नाही. केंद्र सरकारने निर्यातीवर काही प्रतिबंध लागू केले असले तरी त्यापूर्वीच राज्यातील कारखान्यांनी साखरेच्या निर्यातीचे करार केलेले आहेत. राज्यातील १३७ लाख टन साखरेपैकी ५१ लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. तरीही राज्यात गरजेपेक्षा जास्त साखर शिल्लक आहे. त्यामुळे दिवाळी व अन्य सणांच्या वेळी राज्यात कुठेही साखरेची तुटवडा निर्माण होणार नाही, असे गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Sugar production peaks in the state this year, record production from factories this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.