Lokmat Money > बिझनेस न्यूज > २० लाख टनांनी घटणार साखर उत्पादन

२० लाख टनांनी घटणार साखर उत्पादन

चालू विपणन वर्षात देशातील साखरेचे उत्पादन साधारणत: २.६ कोटी टन असेल असा सरकारचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा २० लाख टनांनी कमी असेल.

By admin | Published: October 10, 2015 03:25 AM2015-10-10T03:25:53+5:302015-10-10T03:25:53+5:30

चालू विपणन वर्षात देशातील साखरेचे उत्पादन साधारणत: २.६ कोटी टन असेल असा सरकारचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा २० लाख टनांनी कमी असेल.

Sugar production will decrease by 20 lakh tonnes | २० लाख टनांनी घटणार साखर उत्पादन

२० लाख टनांनी घटणार साखर उत्पादन

नवी दिल्ली : चालू विपणन वर्षात देशातील साखरेचे उत्पादन साधारणत: २.६ कोटी टन असेल असा सरकारचा अंदाज आहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या उत्पादनापेक्षा २० लाख टनांनी कमी असेल. यंदा कमी पडलेल्या पावसामुळे सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये घटलेल्या उत्पादनाच्या शक्यतेनुसार हा अंदाज व्यक्त केला आहे.
केंद्र सरकारचा हा अंदाज राज्य सरकारांच्या अंदाजाशी जुळणारा असला तरी, उद्योग संघटना ‘इस्मा’चा अंदाज खूपच कमी आहे. इस्माने यावर्षीचे साखरेचे उत्पादन २.७ कोटी टन असेल असे म्हटले. २०१४-२०१५ विपणन वर्षात (आॅक्टोबर ते सप्टेंबर) साखरेचे उत्पादन २.८१ कोटी टनांचे होते. जगात भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा साखर उत्पादक आहे. अन्न मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने राज्याच्या ऊस आयुक्तांच्या बैठकीनंतर वृत्तसंस्थेला सांगितले की, विपणन वर्ष २०१५-२०१६ मध्ये साखरेचे उत्पादन २.६ कोटी टन असेल असा अंदाज आहे. एवढे उत्पादन देशातील मागणी पूर्ण करील. महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊस उत्पादनातील संभाव्य घट ही विपणन वर्षातील साखरेच्या उत्पादनात २० लाख टनांची घट करील. कमी पावसामुळे या दोन्ही राज्यांत ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे, असे हा अधिकारी म्हणाला. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्य आहे. त्याने २०१५-२०१६ विपणन वर्षात साखरेचे उत्पादन कमी होऊन ८६ लाख टन असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हे उत्पादन गेल्यावर्षी १.०५१ कोटी टन होते.
कमी पावसामुळे २०१५-२०१६ मध्ये उसाचे उत्पादन कमी होऊन ८.३६ कोटी टन असण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी ते १०.२२ कोटी टन होते. कर्नाटकातही साखरेचे उत्पादन २०१५-२०१६ विपणन वर्षात कमी होऊन ४० लाख टनांचा होण्याचा अंदाज आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

पावसावर भरवसा : उत्तर प्रदेशात सिंचन असले तरी घट
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उसाचे पीक हे बहुतांश पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे, तर उत्तर प्रदेशात ते सिंचनाच्या पाण्यावर.
उत्तर प्रदेश हे देशातील दुसरे मोठा साखर उत्पादक राज्य आहे. तेथे २०१५-२०१६ विपणन वर्षात साखरेचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ७२ लाख टनांएवढेच असण्याचे भाकीत आहे.

अंदाज चुकला
उत्तर प्रदेशने प्रारंभीच केंद्र सरकारला सांगितले होते की, यावर्षी साखरेचे उत्पादन ५ लाख टनांनी जास्त असेल; परंतु शुक्रवारच्या बैठकीत सरकारने २०१५-२०१६ मध्ये साखरेचे उत्पादन गेल्यावर्षीएवढेच म्हणजे ७२ लाख टन असेल असे सांगितले.

Web Title: Sugar production will decrease by 20 lakh tonnes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.