Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वसामान्यांना झटका! दूध, साखर आणि चहा पावडरच्या दरात वाढ

सर्वसामान्यांना झटका! दूध, साखर आणि चहा पावडरच्या दरात वाढ

price hike : या दिवसात टोमॅटोची मागणीही वाढत आहे. 30 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत टोमॅटो 37.87 टक्के महाग झाले आहेत.

By ravalnath.patil | Published: December 7, 2020 01:51 PM2020-12-07T13:51:05+5:302020-12-07T13:51:31+5:30

price hike : या दिवसात टोमॅटोची मागणीही वाढत आहे. 30 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत टोमॅटो 37.87 टक्के महाग झाले आहेत.

sugar tea and milk price hike in december 2020 while flour rice and wheat became cheaper | सर्वसामान्यांना झटका! दूध, साखर आणि चहा पावडरच्या दरात वाढ

सर्वसामान्यांना झटका! दूध, साखर आणि चहा पावडरच्या दरात वाढ

Highlightsमंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गहू, तांदूळ आणि पिठाच्या किंमतीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्यांना  महागाईचा फटका बसत आहे. आता भाज्या आणि डाळीनंतर साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी ग्राहक मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील किरकोळ बाजारात साखरेची सरासरी किंमत 39.68 रुपये प्रति किलो होती, ती 7 डिसेंबरला 43. 38 रुपयांवर गेली आहे. 

याचबरोबर, खुल्या चहाच्या दरातही 11.57 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चहाच्या पावडरचे दर 238.42 रुपयांवरून 266 रुपयांवर गेले आहेत. याशिवाय, दुधाच्या किंमतीतही जवळपास 7 टक्के वाढ होत आहे. दुधाची किंमत 46.74 रुपयांवरून 50 रुपये प्रति लीटर झाली आहे.

टोमॅटोच्या किंमतीतही वाढ
या दिवसात टोमॅटोची मागणीही वाढत आहे. 30 नोव्हेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत टोमॅटो 37.87 टक्के महाग झाले आहेत. दरम्यान, 30 नोव्हेंबरला टोमॅटोची किंमत किरकोळ बाजारात सुमारे 49.88 रुपयांवर पोहोचली आहे, ती 30 नोव्हेंबरला 36.18 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला गेला.

तेलाच्या किंमतीत दिलासा
खाद्य तेलांच्या दरात घट झाली आहे. पाम तेलाची किंमत 102 रुपयांवरून 92 रुपयांवर आली आहे. याशिवाय सूर्यफूल तेलाची किंमत 124 रुपयांवरुन 123 रुपयांवर आली आहे. शेंगदाण्याचे तेल 156 रूपयांवरून 145 रुपये आणि मोहरीचे तेलही प्रति लिटर 135 रुपयांवरून 132 रुपयांवर आले आहे. तर, सोया तेलाच्या किंमतींमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पीठ, तांदूळ आणि गहू झाले स्वस्त
मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गहू, तांदूळ आणि पिठाच्या किंमतीत सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. गव्हाच्या किंमतीत सुमारे 19.45 टक्क्यांनी घट झाली आहे. यावेळी गव्हाची किंमत 29 रुपयांवरुन 24 रुपयांवर गेली आहे. याशिवाय, किरकोळ बाजारात पीठाची किंमत 32 रुपयांवरुन 28 रुपयांवर गेली आहे. तसेच, तांदळाचे दरही घसरले आहेत. तर हरभरा आणि उडीद डाळ स्वस्त झाली.
 

Web Title: sugar tea and milk price hike in december 2020 while flour rice and wheat became cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.