Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुकन्या समृद्धी कॅलक्युलेटर : १०००, २०००, ३०००, ५००० ₹ च्या गुंतवणूकीवर केव्हा, किती मिळणार रिटर्न

सुकन्या समृद्धी कॅलक्युलेटर : १०००, २०००, ३०००, ५००० ₹ च्या गुंतवणूकीवर केव्हा, किती मिळणार रिटर्न

कोणतीही भारतीय व्यक्ती तिच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 01:11 PM2023-10-31T13:11:02+5:302023-10-31T13:11:38+5:30

कोणतीही भारतीय व्यक्ती तिच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकते.

Sukanya Samriddhi Calculator When and how much return on investment of rs 1000 2000 3000 5000 know details | सुकन्या समृद्धी कॅलक्युलेटर : १०००, २०००, ३०००, ५००० ₹ च्या गुंतवणूकीवर केव्हा, किती मिळणार रिटर्न

सुकन्या समृद्धी कॅलक्युलेटर : १०००, २०००, ३०००, ५००० ₹ च्या गुंतवणूकीवर केव्हा, किती मिळणार रिटर्न

Sukanya Samriddhi Yojana Calculator: कोणतीही भारतीय व्यक्ती तिच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकते. सध्या या योजनेत 7.6 टक्के व्याज मिळत आहे. वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.50 लाख रुपये गुंतवण्याची सूट यामध्ये आहे. मुलीसाठी 15 वर्षांसाठी योजनेत योगदान देता येईल. म्हणजे ही योजना 21 वर्षात मॅच्युअर होते. जितक्या कमी वयात तुम्ही तुमच्या मुलीसाठी गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मॅच्युरिटी रक्कम वापरण्यास सक्षम व्हाल.

जन्मापासून सुरू केल्यास अधिक फायदा
जर तुम्ही मुलीच्या जन्मापासून सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत तिच्यासाठी चांगली रक्कम जमा होईल. आता जर गुंतवणुकीची रक्कम रु 1000, 2000, 3000 किंवा 5000 असेल तर तुम्हाला मॅच्युरिटी पर्यंत किती फायदा होईल ते जाणून घेऊ.

1000 रुपये गुंतवल्यास
या योजनेत तुम्ही मासिक 1000 रुपये गुंतवल्यास, वर्षाला 12 हजार रुपये जमा होतील. सुकन्या समृद्धी कॅल्क्युलेटरनुसार, 15 वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक 1,80,000 रुपये असेल आणि 3,29,212 रुपये फक्त व्याजातून मिळतील. अशा प्रकारे, मॅच्युरिटीवर एकूण 5,09,212 रुपये मिळतील.

2000 रुपये गुंतवल्यास
तुम्ही दरमहा 2,000 रुपये गुंतवल्यास, तुम्ही वार्षिक 24,000 रुपये जमा कराल. एकूण गुंतवणूक 3,60,000 रुपये असेल आणि व्याजातून मिळणारं उत्पन्न 6,58,425 रुपये असेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम 10,18,425 रुपये असेल.

3000 रुपये गुंतवल्यास
जर आपण दरमहा 3000 रुपयांवर आधारित कॅलक्युलेशन पाहिलं तर वार्षिक 36,000 रुपये जमा होतील. तुमची एकूण गुंतवणूक 5,40,000 रुपये असेल. तर व्याजातून होणारी कमाई 9,87,637 रुपये असेल. यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला 15,27,637 रुपये मिळतील.

4000 रुपये गुंतवल्यास
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये महिन्याला 4000 रुपये गुंतवल्यास तुमचे वर्षाला 48,000 रुपये जमा होतील. 15 वर्षांत एकूण 7,20,000 रुपयांची गुंतवणूक होईल. व्याजातून मिळणारं उत्पन्न 13,16,850 रुपये असेल. मॅच्युरिटीनंतर मुलीसाठी एकूण 20,36,850 रुपयांचा निधी तयार होईल.

5000 रुपये गुंतवल्यास
मासिक 5000 रुपये गुंतवल्यास, तुमचे वार्षिक 60,000 रुपये जमा होतील. अशा प्रकारे 15 वर्षात एकूण 9,00,000 रुपयांची गुंतवणूक होईल. तर व्याजातून 16,46,062 रुपये मिळतील. मुदतपूर्तीनंतर एकूण 25,46,062 रुपयांचा मोठा निधी तयार होईल.

Web Title: Sukanya Samriddhi Calculator When and how much return on investment of rs 1000 2000 3000 5000 know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.