Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुकन्या समृद्धीवर मिळतंय अधिक व्याज, गुंतवणूकीची योग्य वेळ; वाचा कसं उघडू शकता खातं

सुकन्या समृद्धीवर मिळतंय अधिक व्याज, गुंतवणूकीची योग्य वेळ; वाचा कसं उघडू शकता खातं

अल्पबचत योजना सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 02:57 PM2024-01-03T14:57:27+5:302024-01-03T15:04:32+5:30

अल्पबचत योजना सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे.

Sukanya Samriddhi gets more interest right time to invest Read how to open an account of a girl child | सुकन्या समृद्धीवर मिळतंय अधिक व्याज, गुंतवणूकीची योग्य वेळ; वाचा कसं उघडू शकता खातं

सुकन्या समृद्धीवर मिळतंय अधिक व्याज, गुंतवणूकीची योग्य वेळ; वाचा कसं उघडू शकता खातं

SSY Interest Rate Hiked: अल्पबचत योजना सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजदरात नुकतीच वाढ करण्यात आली आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी (जानेवारी-मार्च) सुकन्या समृद्धी (Sukanya Samriddhi Account Yojana) योजनेवरील व्याजदरात ०.२० टक्क्यांनी वाढ केली आहे, आता गुंतवणूकदारांना ८.२% दराने व्याज मिळेल. मुलींच्या आर्थिक सुरक्षेसाठी ही गुंतवणूक योजना सर्वाधिक पसंत केली जाते. अल्पबचत योजनांची यादी पाहिल्यास, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना या दोनच योजना आहेत ज्यावर तुम्हाला ८.२ टक्के परतावा मिळतो, इतर सर्व योजनांचा व्याजदर यापेक्षा कमी आहे.

या योजनेवर तुम्हाला केवळ चांगला परतावा मिळत नाही, तर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांची कर सूट देखील मिळते. अशा स्थितीत या वर्षी गुंतवणूकीसाठी ही चांगली योजना ठरू शकते. तुम्हीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेत खाते उघडू शकता. चला जाणून याबद्दल अधिक माहिती.

कुठे उघडता येतं खातं?
तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा सरकारी बँक तसंच खाजगी बँकांद्वारे या योजनेत गुंतवणूक करू शकता ज्या ही योजना चालवत आहेत. यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतील. तुम्हाला मुलीचे बर्थ सर्टिफिकेट, तुमचा फोटो आयडी, तुमचा पत्ता पुरावा आणि केवायसीसाठी पॅन किंवा मतदार ओळखपत्र द्यावं लागेल. यासाठी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.

कसं ऑनलाइन उघडाल खातं?

  • सर्वप्रथम, आरबीआय वेबसाइट, पोस्ट ऑफिस किंवा स्कीम चालवणाऱ्या कोणत्याही बँकेच्या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा आणि तो भरा.फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यासाठी IPPB (इंडियन पोस्ट पेमेंट बँक) अॅप ​​डाउनलोड करावं लागेल.
  • सर्वप्रथम तुमच्या IPPB खात्यात पैसे जमा करा.
  • त्यानंतर अॅपवरील प्रोडक्ट्स सेक्शनमध्ये जा आणि सुकन्या समृद्धी योजना खात्याचा पर्याय निवडा.
  • तुमचा SSY खाते क्रमांक आणि DOP क्लायंट आयडी देखील प्रविष्ट करा.
  • आता तुम्हाला टाकायची असलेली रक्कम टाका आणि तो कोणता हप्ता असेल ते टाका.
  • यानंतर, एकदा पेमेंट प्रक्रिया सेट केल्यानंतर, तुम्हाला अॅपवरून एक नोटिफिकेशन मिळेल आणि तुमची पहिलं डिपॉझिट अँड झाल्यानंतर प्रोसेस सुरू होईल.
  • तुम्ही अॅपमध्ये ऑटोमेटेड ट्रान्झॅक्शन सेटअप करू शकता. याच्या मदतीनं तुम्ही जेव्हा वेळ सेट कराल तेव्हा पैसे आपोआप कापले जातील.
     

कसं उघडाल ऑफलाइन खातं?

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जा.
  • तेथून फॉर्म घ्या, आवश्यक तपशील भरा आणि जी काही कागदपत्रे मागितली आहेत त्याच्या कॉपी अटॅच करा.
  • रोख, धनादेश किंवा डीडीद्वारे पहिलं डिपॉझिट जमा करा. तुम्ही एकावेळी २५० ते १.५ लाख रुपये जमा करू शकता.
  • तुमचं पेमेंट प्रोसेस केल्यानंतर खातं अॅक्टिव्हेट केलं जाईल. याशिवाय तुम्हाला त्यासोबत पासबुकही दिलं जाईल.

Web Title: Sukanya Samriddhi gets more interest right time to invest Read how to open an account of a girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.