आजच्या काळात मिक्सर (Mixer Grinder) ही प्रत्येक घरात असलेली महत्त्वाची वस्तू झाली आहे. परंतु काही दशकांपूर्वी हे मशीन लक्झरी मानलं जात होतंआणि या सेगमेंटमध्ये विदेशी कंपन्यांचाच बोलबाला होता. जवळपा ६० वर्षांपूर्वी पहिली स्वदेशी मिक्सर कंपनी सुमीत (Sumeet Appliances) या नावानं मिळाली आणि आज जगभरात या कंपनीचा बोलबाला आहे. ही कंपनी बनण्याची गोष्टही तितकीच जबरदस्त आहे. या शोधामागे पत्नीच्या टोमणा असल्याचं मसोर आलं आहे.
सुमीत या कंपनीनं आपल्या अधिकृत बेवसाईटवर याची एक गोष्ट शेअर केली आहे. कंपनीचे संस्थापक एसपी माथुर (SP Mathur) त्यावेळी जर्मन मल्टीनॅशनल कंपनी Siemens मध्ये इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या घरी इम्पोर्टेड मिक्स ब्लेंडर वापरला जात होता. परंतु एकदा घरी गरम मसाला वाटताना त्याची मोटर जळाली. तेव्हा माथुर यांच्या पत्नीनं ते ठीक करण्यास सांगितलं. पण अनेक प्रयत्न करूनही ती मोटर ठीक झाली नाही तेव्हा त्यांच्या पत्नीनं यावर टोमणा मारला. तेव्हा माथुर यांना भारतीय किचनसाठी आवश्यक असेल असा मिक्सर बनवण्याची कल्पना आली.
भारतीय किचननुसार केलं तयार
माथूर यांनी भारतीय लोकांच्या खाण्याच्या सवयी लक्षात घेऊन एक नवीन मशीन तयार केलं. त्यांनी त्याचे नाव सुमीत ठेवले. हा एक संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ चांगला मित्र असा आहे. हे स्वदेशी मिक्सर आयात केलेल्या मशिन्सपेक्षा जास्त भार उचलण्यास आणि जड वस्तू न थांबता वाटण्यास सक्षम होते. हे पहिले मशीन होते जे केवळ मिक्सिंगच नव्हे तर चॉपिंग आणि ग्राईंडिंग करण्यास देखील सक्षम होते. यापासून गरम मसाला पावडरही आणि इडलीची पेस्टही तयार करता येत होती.
पहिल्यादा आल्या होत्या गोष्टी
त्यानंतर माथूर यांनी सीमेन्सची नोकरी सोडून सुमीत अप्लायन्सेस नावाची स्वतःची कंपनी सुरू केली. आपल्या वडिलांनी स्वयंपाक ही एक कला मानली आणि त्याबद्दल त्यांना खूप आवड होती. उच्च शक्तीसह, न थांबता आणि गरम न करता किमान ३० मिनिटे चालू शकते. अदलाबदल करण्यायोग्य ब्लेड आणि स्टीलचे भांडे देखील प्रथम सुमीत अप्लायन्सेसने वापरले होते, जे आज सर्व ब्रँड वापरत आहेत. अशा प्रकारची इलेक्ट्रीक मोटर विकसित करणारे त्यांचे वडील पहिलेच व्यक्ती होते, असं कंपनीचे विद्यमान एमडी अजय माथूर यांनी सांगितलं.
अनेक देशांत निर्यात
साठ वर्षांपूर्वी या प्रवासाची सुरुवात झाल्यानंतर आज जगभरात तीन कोटींपेक्षा अधिक लोकांकडे सुमीत मिक्सरचा वापर होत आहे. आज कंपनी याशिवाय हेल्थ प्रोसेसर, कुकवेअर, कॉफी मशीनही बनवत आहे. हा ब्रँड केवळ भारतातच नाही तर विदेशातही प्रसिद्ध झाला आहे. कंपनी सध्या अमेरिका, ब्रिटनसह २० देशांमध्ये आपल्या वस्तू निर्यात करते.