मुंबई : सूर्या नावाने महाराष्ट्राच्या काही भागांत बनावट उत्पादने बाजारात विकली जात आहेत, अशी माहिती मिळताच, पोलिसांनी पुणे आणि कोल्हापुरात छापे घातले. त्यात कित्येक वितरक सूर्या ब्रँडचे नाव वापरून, बनावट मिक्सर, ग्रार्इंडर, इंडक्शन कुक टॉप, लायटिंग, स्टील पाइप, पीव्हीसी पाइप, फॅन्स आदी उपकरणे विकत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ही बनावट उत्पादने हस्तगत केली आहेत. फसवणूक, घोटाळा याबरोबरच ग्राहकांचे नुकसान केल्याची तक्रार वितरकांच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे.
सूर्या रोशनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री बी राजू म्हणाले, आज आमची उत्पादने मोठ्या प्रमाणात वापरली जातात आणि ती आज प्रत्येक इलेक्ट्रिकल दुकानात उपलब्ध आहेत. आमची उत्पादने विजेची बचत करणारी असून, त्याद्वारे ग्राहकांचा फायदा व्हावा, असाच आमचा हेतू असतो. पण बनावट उत्पादनांद्वारे ग्राहकांची फसवणूक करणे आणि आमच्या उत्पादनांविषयी ग्राहकांत संशयाचे वातावरण निर्माण करणे हा प्रकार सुरू आहे. असे करणाऱ्यांविरुद्ध आम्ही कारवाई करीतच राहू. (वाणिज्य प्रतिनिधी)
सूर्याची बनावट उत्पादने; पुणे, कोल्हापुरात धाडी
सूर्या नावाने महाराष्ट्राच्या काही भागांत बनावट उत्पादने बाजारात विकली जात आहेत, अशी माहिती मिळताच, पोलिसांनी
By admin | Published: March 30, 2017 07:21 AM2017-03-30T07:21:47+5:302017-03-30T07:21:47+5:30