Join us  

सुपरटेकचे चेअरमन आर के अरोरा यांना अटक, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी EDची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 9:32 AM

Supertech Chairman RK Arora : ईडीने मंगळवारी सुपरटेकचे मालक आरके अरोरा यांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून ईडीकडून अरोरा यांची चौकशी सुरू होती.

Supertech Chairman RK Arora : ईडीनं (ED) कन्स्ट्रक्शन कंपनी सुपरटेकचे अध्यक्ष आरके अरोरा यांना त्यांच्या दिल्लीतील कार्यालयातून अटक केली. मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. ईडी गेल्या तीन दिवसांपासून आरके अरोरा यांची चौकशी करत होती. केंद्रीय यंत्रणेनं मंगळवारी चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली.

रिपोर्टनुसार, मंगळवारीही ईडीने आरके अरोरा यांना चौकशीसाठी बोलावलं होते. रात्री उशिरा चौकशीनंतर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अरोरा यांना अटक करण्यात आली. लाइव्ह हिंदुस्थानने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे. ईडीनं अटक केल्याची माहिती अरोरा यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. आरके अरोरा हे बिल्डर्सची संघटना NEREDCO चे अध्यक्ष देखील आहेत.

अनेक राज्यांत FIR दिल्ली पोलीस, हरियाणा पोलीस आणि यूपी पोलिसांकडून सुपरटेक ग्रुप ऑफ कंपनीजच्या विरोधात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या एफआयआरच्या आधारे, ईडीनं मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास सुरू केला. या सर्व एफआयआरमध्ये एकच आरोप होता. कंपनी आणि तिचे संचालक त्यांच्या रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये बुक केलेल्या फ्लॅट्ससाठी संभाव्य खरेदीदारांकडून आगाऊ पैसे घेऊन लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला. फ्लॅट्सचा ताबा वेळेवर देण्यात कंपनी अपयशी ठरत असल्याचाही आरोप यात करण्यात आलाय.

पैसे केले डायव्हर्टसुपरटेक लिमिटेड आणि इतर समूह कंपन्यांनी घर खरेदीदारांकडून पैसे जमा केल्याचे ईडीच्या कारवाईत उघड झाले आहे. तसंच फ्लॅट बनविण्याच्या नावाखाली बँकांकडून कर्ज घेण्यात आलं आणि हा निधी इतर ग्रुप कंपन्यांच्या नावावर जमीन खरेदी करण्यासाठी वळवला. बँकांकडून कर्ज घेण्यासाठी या जमिनी पुन्हा गहाण ठेवल्या होत्या. सुपरटेक ग्रुपनंही बँकांचे पैसे डिफॉल्ट केले. अशी सुमारे १५०० कोटी रुपयांची कर्जे एनपीए झाली आहेत. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयपोलिस