नवी दिल्ली : महामार्ग बांधणी प्रकल्पांना १.३० लाख कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची हमी बँकांनी दिली आहे, अशी माहिती परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. त्यांनी सांगितले की, संपुआ सरकारच्या काळात ३.८५ लाख कोटी रुपयांचे ४०३ प्रकल्प रखडले होते. रालोआ सरकारने सत्ता ताब्यात घेतल्यापासून त्यातील ३ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावले आहेत.
गडकरी म्हणाले की, रस्ते बांधणी प्रकल्पांना निधी मिळावा, यासाठी आपण बँका, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि केंद्रीय वित्तमंत्री यांच्या भेटी घेतल्या. बँकांनी लेखी स्वरूपात सांगितले की, अभियांत्रिकी संपादन बांधकाम पद्धतीतील १.३० लाख कोटींच्या प्रकल्पांना अर्थसाह्य करण्यास आपण तयार आहोत. गडकरी म्हणाले की, मे २०१४ मध्ये देशातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९१ हजार किलोमीटर होती. वाहन उद्योगाची वार्षिक वाढ २२ टक्के असल्यामुळे हे रस्ते अपुरे होते. सरकारने राष्ट्रीय महामार्गांची लांबी दुपटीने वाढवून १.८० लाख कि.मी. केली आहे. यातील १.३० लाख कि.मी.चे महामार्ग केंद्राच्या नियंत्रणात आहेत.
महामार्ग प्रकल्पांना बँकांचे साह्य - गडकरी
महामार्ग बांधणी प्रकल्पांना १.३० लाख कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याची हमी बँकांनी दिली आहे, अशी माहिती परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 01:21 AM2018-07-20T01:21:18+5:302018-07-20T01:21:28+5:30