Lokmat Money > बिझनेस न्यूज > सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी

सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी

याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीचा अहवाल मागितला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 11:00 AM2023-06-08T11:00:43+5:302023-06-08T11:00:57+5:30

याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीचा अहवाल मागितला आहे.

supreme court seeks report from registry hearing on petition regarding 2000 notes | सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी

सुप्रीम कोर्टाने मागविला रजिस्ट्रीकडून अहवाल; २००० च्या नोटेसंबंधी याचिकेवर सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : कोणत्याही प्रकारच्या ओळख पडताळणीशिवाय २ हजारांच्या नोटा बदलून देण्याच्या अधिसूचनेच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या रजिस्ट्रीचा अहवाल मागितला आहे.

याचिकाकर्ता वकील अश्विनी उपाध्याय यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयास केली. त्यानंतर न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. राजेश बिंदल यांच्या सुटीकालीन न्यायपीठाने रजिस्ट्रीकडून अहवाल मागविला.

यापूर्वी दिला हाेता नकार

- याआधी १ जून रोजी न्यायालयाने यावर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता.  

- त्यानंतर ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, माओवादी, अतिरेकी आणि फुटीरवादी गट २ हजारांच्या नोटा बदलून घेत आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आतापर्यंत ८० हजार कोटी रुपयांच्या नोटा बदलण्यात आल्या आहेत.

 

Web Title: supreme court seeks report from registry hearing on petition regarding 2000 notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.