Join us

आश्चर्य! झुनझुनवालांच्या शेअरमध्ये अचानक आली तेजी, घेतलाय रॉकेट स्पीड; भाव ₹448 पार; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 4:03 PM

या शेअरने आपलाच डिसेंबर 2007 मधील 448.5 रुपये प्रति शेअर हा उचांक ओलांडला आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील एका स्टॉकमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी बघायला मिळाली. हा शेअर अ‍ॅपटेक कंपनीचा आहेत. बाजार कमकुवत असूनही, Aptech च्या शेअरने 6% उसळी घेतली असून तो इंट्रा-डे ट्रेडमध्ये 453 रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. 

हा शेअर गेल्या दोन दिवसांत 11 टक्क्यांनी वधारला आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरने 15 वर्षांहून अधिक कालावधीनंतर नवा उच्चांक गाठला आहे. या शेअरने आपलाच डिसेंबर 2007 मधील 448.5 रुपये प्रति शेअर हा उचांक ओलांडला आहे.

झुनझुनवाला फॅमिलीजवळ 23.35 टक्के वाटा -शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटानुसार, दिग्गज गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांची पत्नी आणि अ‍ॅप्टेकच्या प्रमोटर्स पैकी एक असलेल्या रेखा राकेश झुनझुनवाला यांची कंपनीमध्ये 23.35 टक्के एवढी हिस्सेदारी आहे. आकडेवारीचा विचार करता, या शेअरमध्ये रेअर इक्विटी प्रायव्हेट लिमिटेडचा 20.39 टक्के एवढा वाटा आहे. गेल्या 10 महिन्यांत अ‍ॅप्टेकच्या शेअरची किंमत जून 2022 मध्ये 196.05 रुपयांपेक्षा दुपटीहून अधिक अथवा 131 टक्के वाढली आहे.

Aptech आणि त्याच्या सहाय्यक कंपन्या प्रामुख्याने एज्युकेशन ट्रेनिंग आणि असेसमेंट सॉल्यूशन सर्व्हिसेसच्या उद्योगात आहेत. ही एक ग्लोबल लर्निंग सॉल्यूशन कंपनी आहे. जी गेल्या तीन दशकांपासून एज्युकेशन आणि ट्रेनिंग बिझनेसमध्ये सक्रीय आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या एप्रिल-जून तिमाहीनंतर, अॅप्टेकचा फायनांशिअल रिपोर्टही चांगला आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक